27.8 C
Latur
Thursday, October 21, 2021
Homeमहाराष्ट्रवाझेचे मीरा रोड कनेक्शन उघड

वाझेचे मीरा रोड कनेक्शन उघड

एकमत ऑनलाईन

मुंबई : सचिन वाझे प्रकरणी एनआयएने मीर रोडच्या कनकिया भागातील ७११ रेसिडेन्सी वसाहतीत धाड टाकून एका सदनिकेची तपासणी केली. त्यानंतर सदनिका मालक आणि त्यातील भाडेकरू महिलेची चौकशी करण्यात आली. त्यामुळे वाझेचे मीरा रोड कनेक्शन उघडकीस आल्याचे बोलले जात आहे.

उद्योजक मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्कॉर्पिओ गाडीत सापडलेल्या जिलेटीन कांड्या आणि मनसुख हिरेन हत्याकांड प्रकरणातील अटक सचिन वाझेशी संबंधित तपासाचे धागेदोरे मिरारोडपर्यंत पोहोचले आहेत. एनआयएने गुरुवारी मीरा रोड पोलिस ठाण्याच्या हद्दीमधील कनकिया परिसरातील सेव्हन इलेव्हन रेसीडेन्सीमधील सी विंगच्या फ्लॅट नंबर ४०१ मध्ये पथकाने तपासणी केली. सदर सदनिका पियुष गर्ग यांच्या नावे असून, जाफर शेख या इस्टेट एजंटच्या माध्यमातून गेल्या ४ वर्षांपासून मीना जॉर्ज या त्यांच्या मुलीसह भाड्याने राहात होत्या.

गेल्या १५ दिवसांपासून सदर सदनिका बंद होती. त्यात राहणारे भाडेकरू अचानक सदनिका बंद करून गेले होते. मीना ही वाझेच्या परिचयातील असून, तिला एनआयएने चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. तिला सुद्धा मीरा रोडच्या घरी आणण्यात आले. त्याठिकाणी मालक गर्ग, भाडेकरू मीना यांची चौकशी तसेच सदनिकेत कसून तपासणी करण्यात आली, असे सूत्रांनी सांगितले.

काळा पैसा पांढरा करायची मीना?
मीनाला ठाणे जिल्ह्यातील मीरारोड भागात फ्लॅटमधून पकडले गेले. येथे ती भाड्याने राहत होती. मीना ही सचिन वाझेच्या काळ्या पैशांना पांढरे करण्यासाठी मदत करत होती, असा एनआयएला संशय आहे. एनआयएने मीनाच्या फ्लॅटचीही झडती घेतली आणि मीनाची चौकशी केली आणि येथून बरीच कागदपत्रे हस्तगत केली. रात्री उशिरा तिला एनआयएच्या कार्यालयात नेण्यात आले.

बनावट सीमकार्डसाठी वापरलेली कागदपत्रे जप्त
रेस्टॉरंटमध्ये छापा टाकताना एनआयएने बनावट नावे सीमकार्ड मिळवण्यासाठी वापरलेली कागदपत्रे जप्त केली आहेत. या प्रकरणात रेस्टॉरंट मॅनेजर संशयाच्या भोव-यात आहेत.

दोन दिवसांनंतर राज्यात लॉकडाऊन ?

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या