22.3 C
Latur
Wednesday, August 17, 2022
Homeमहाराष्ट्रराज्याच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध

राज्याच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध

एकमत ऑनलाईन

मुंबई : महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर लगेच कामाला सुरूवात केली आहे. शुक्रवार दि. १ जून रोजी त्यांनी माध्यमांशी बोलताना राज्यातील रखडलेल्या विविध प्रकल्पाला नवसंजीवनी देणार असल्याचे सांगितले आहे.

आम्ही राज्यातील विकास प्रकल्पाला त्याचबरोबर जलसंदाच्या कामाला चालना देणार आहोत. जलसंपदाच्या कामामुळे अनेक शेतक-यांच्या जमीन पाण्याखाली येणार आहेत. राज्याचा विकास करण्यासाठी जे करता येईल ते सर्व राज्य सरकार करणार आहे असे मुख्यमंत्री म्हणाले. आज वसंतराव नाईक यांची जयंती आहे त्यानिमित्ताने महाराष्ट्रात कृषीदिन साजरा करतात. त्यानिमित्ताने महाराष्ट्रात एकही शेतकरी आत्महत्या नाही झाली पाहिजे हा आमचा प्रयत्न असेल. गोव्यातील आमदार उद्या महाराष्ट्रात येणार आहेत. ते आल्यावर आम्ही बहुमत चाचणीला सामोरे जाणार आहोत असे त्यांनी सांगितले.

शेतमालाच्या हमीभावासाठी संकल्प
शेतमालाला हमीभाव मिळाला पाहिजे, शेतकरी संकटात येऊन नये यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतक-यांचे जीवन सुखी झाले पाहिजे यासाठी राज्य सरकार वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्ताने संकल्प करत आहे. तसेच राज्यातील रखडलेले प्रकल्प मार्गी लावले जातील. राज्याच्या विकासासाठी जे जे करता येईल ते आम्ही करणार आहोत असे त्यांनी सांगितले आहे.

आपत्ती व्यवस्थापनाची बैठक
मुंबईत जास्त पाऊस आहे, तेथील लोकांना काही त्रास न व्हावा यासाठी आम्ही आपत्ती व्यवस्थापनाची बैठक घेत आहोत असेही त्यांनी सांगितले. मेट्रो आणि शेतक-यांसाठी फायद्याचे प्रकल्प आम्ही राबवणार आहोत. सध्या गोव्यात असलेले आमदार उद्या मुंबईत येणार आहेत आणि राज्यपालांनी ३ आणि ४ तारखेला विशेष अधिवेशन बोलावले आहे तेव्हा आम्ही बहुमत चाचणीला समोर जाणार आहोत असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या