22.2 C
Latur
Friday, August 19, 2022
Homeमहाराष्ट्रराऊतांवरच्या कारवाईमुळे आम्ही आनंदी

राऊतांवरच्या कारवाईमुळे आम्ही आनंदी

एकमत ऑनलाईन

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरी ईडीचे पथक पोहोचले आहे. सकाळी सात वाजल्यापासून राऊतांच्या घरामध्ये ईडीची चौकशी सुरू आहे. वातावरण तापले असून घराबाहेर राऊत समर्थकांनी गर्दी करत जोरदार घोषणाबाजी सुरू केली आहे. अशातच या कारवाईमुळे आम्हाला आनंद झाल्याची प्रतिक्रिया शिंदे गटाकडून येत आहे.

शिंदे गटातले आमदार संजय शिरसाट यांनी ही पहिली प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी बोलताना शिरसाट म्हणाले की, संजय राऊत हुशार नेते आहेत. त्यांना ईडी वगैरे कशाची भीती वाटत नाही. त्यांना आत्मविश्वास आहे की आम्ही जे करतो ते खरं आहे.

जेव्हा एवढी मोठी धाड पडते, तेव्हा अटकेची शक्यता जास्त आहे. शिवसैनिक आज आनंदी झाला. ज्याच्यामुळे, ज्याच्या भोंग्यामुळे शिवसेना फुटली, त्याच्यावर कारवाई झाली त्यामुळे आनंद आहे. हा काही लोकनेता नाही, तो प्रवक्ता होता. त्यामुळे त्याच्याविरोधात काही उठाव वगैरे होणार नाही.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या