21.9 C
Latur
Monday, August 15, 2022
Homeमहाराष्ट्रआम्ही बंडखोर नाहीच ; गुलाबराव पाटील संजय राऊतांवर भडकले

आम्ही बंडखोर नाहीच ; गुलाबराव पाटील संजय राऊतांवर भडकले

एकमत ऑनलाईन

मुंबई : बंडखोरांनी काय ते एक कारण सांगावे. असा टोला संजय राऊत यांनी लगावला होता. आज जळगावमध्ये पत्रकारांशी बोलत असताना गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिलं. आमचा पक्ष वाढवण्यामध्ये आमचे लोक कमी पडले, तो पक्ष वाचवण्यासाठी आम्ही हा उठाव केला आहे.

आम्ही बंडखोर नाहीच, आम्ही शिवसेनेतच आहोत. उलट आम्ही शिवसेना वाचवत आहोत, त्यासाठी आम्ही मंत्रिपदे सोडली, कुणी मायचा लाल ग्रामपंचायतचं सरपंचपद सोडत नाही, असंही गुलाबराव पाटील यांनी ठणकावून सांगितले.

आमचा उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्याबद्दल विरोध नाही ते आम्हाला आदराचे आहेत. कोण माणूस शुक्राचार्य आहे तो तुम्हाला माहिती आहे, त्याने आमच्या पक्षाचा सत्यानाश केलाय, तो पक्ष आम्ही वाचवतोय, अशा शब्दांत गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

दीपक केसरकरांची राऊतांवर टीका
दरम्यान, ‘उद्धव ठाकरे साहेबांनी आम्हाला बोलावले तर आम्हालाही आनंद होईल. पण आता आम्ही एकटे नाही. आम्ही आता भाजप बरोबर आहोत त्यामुळे त्यांच्याशीही संवाद साधावा लागेल.

आम्ही संवाद साधत असताना आम्हाला थेट साहेबांशी बोलायचे आहे. मधले आजुबाजूचे लोक बाहेर ठेवून संवाद साधावा ही अपेक्षा आहे.असं म्हणत शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी शिवसेनेसोबत चर्चेची अपेक्षाच बोलून दाखवली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या