Saturday, September 23, 2023

“एकुलत्या एक पुत्राने देशासाठी प्राणार्पण केल्याचा आम्हाला अभिमान”

नवी दिल्ली : एकुलता एक मुलगा गमावल्याचे दुःख आहे, मात्र त्याने देशासाठी प्राणार्पण केले, याचा अभिमान असल्याची प्रतिक्रिया चीनी सैन्यासोबत झालेल्या संघर्षात शहीद झालेल्या कर्नल बिक्कुमल्ला संतोष बाबू यांच्या मातोश्रींनी दिली.

आता तो मला अम्मा म्हणून हाक मारणार नाही. एकुलता एक मुलगा गमावल्याचे दुःख आहे. पण देशासाठी त्याने आपल्या प्राणाचे बलिदान दिले, याचा मला अभिमान आहे, असं संतोष यांच्या आई मंजुळा यांनी म्हटलं आहे.

शहीद कर्नल बिक्कुमल्ला संतोष बाबू यांची हैदराबादमध्ये पोस्टिंग झाल्याची ऑर्डर 3 महिन्यांपूर्वीच हाती आली होती. मात्र लॉकडाऊन आणि चीनसोबत असलेल्या तणावामुळे पोस्टिंग लांबली होती.

चीनी सैन्यासोबत गलवानच्या खोऱ्यात झालेल्या धुमश्चक्रीत भारताचे 20 जवान शहीद झाल्याचं दु:खद वृत्त आहे. शहीदांची संख्या वाढण्याची भीतीही वर्तवली जात आहे.

Read More  चीननं गलवान खोर्‍यात केलेल्या हल्ल्यात कर्नल संतोष बाबूंना हौताम्य

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या