27 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeमहाराष्ट्रराज्यपालांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही

राज्यपालांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही

एकमत ऑनलाईन

मालेगाव : महाराष्ट्रातून खास करून मुंबई आणि ठाणे येथून गुजराती आणि राजस्थानी लोकांना हटवले तर महाराष्ट्रात पैसाच राहणार नाही. तुम्ही मुंबई आर्थिक राजधानी म्हणता; पण गुजराती आणि राजस्थानी लोक नसतील तर मुंबई ही आर्थिक राजधानीच राहणार नाही, असे उद्गार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काढले आहेत.

मुंबईतील एका कार्यक्रमात ते बोलत होते. कोश्यारींच्या वक्तव्यावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राज्यपाल हे मोठे पद आहे. ते एक संविधानिक पद असून कुणाचाही अवमान होणार नाही, याची काळजी त्यांनी घेतली पाहिजे. राज्यपालांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही, असे स्पष्ट मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. ते मालेगावमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या