22.1 C
Latur
Sunday, August 14, 2022
Homeमहाराष्ट्रआमच्याकडे कोणताही प्रस्ताव नाही

आमच्याकडे कोणताही प्रस्ताव नाही

एकमत ऑनलाईन

मुंबई : खरी शिवसेना कोणाची, शिवसेनेचा गट कोणता, हिंदुत्वाच्या विचारावर जाण्याची कोण हमी देत आहे, याचे विश्लेषण होत आहे. या विश्लेषणाच्या आधारावर जर कोणी प्रस्ताव दिला तर विचार केला जाईल, असे वक्तव्य भाजपचे आमदार आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

आजपर्यंत या संदर्भात कोणताच प्रस्ताव आला नाही. मग कारण नसताना त्यांच्या अंतर्गत कलहामध्ये भाजपने नाक खुपसायचं काही कारण नसल्याचे मुनगंटीवार म्हणाले.

आमची जबाबदारी जनतेचे प्रश्न सोडवण्याची आहे. कोणीही आमच्याकडे आलेलं नसताना नाक खुपसायची जबाबदारी आमची नाही. राज्यातील नेत्यांना नांदेडच्या पुराची चिंता नाही पण आसामच्या पुराची चिंता असल्याचे म्हणत मुनगंटीवार यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना टोला लगावला.

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्यात काही तथ्य नाही. या चर्चेमागे ते आहेत ज्यांना आमदार फुटण्यात आपली चूक नाही हे सिध्द करायचे आहे असेही मुनगंटीवार म्हणाले. राज्यातील कायदा-सुव्यवस्था बिघडत असेल आणि गुंडांचे राज्य येणार असेल तर त्याला गृहमंत्री निश्चित जबाबदार आहेत. गृहमंत्र्यांनी जनतेच्या हितासाठी काम करावे नाही तर इतिहास त्यांना माफ करणार नाही असेही ते म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या