27.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeमहाराष्ट्रकॅमेरे नेता येतील तिथेच आम्ही जातो; मुख्यमंत्री शिंदेंचा अजित पवारांना टोला

कॅमेरे नेता येतील तिथेच आम्ही जातो; मुख्यमंत्री शिंदेंचा अजित पवारांना टोला

एकमत ऑनलाईन

मुंबई : ‘आम्ही स्वत: फोटो काढत नाही, जनता फोटो काढते आणि ते व्हायरल करते. तसेच आम्ही आमच्यासोबत कॅमेरे नेतो, कॅमेरे जिथे नेता येतील, तिथेच आम्ही जातो, असा टोला त्यांनी अजित पवारांना नाव न घेता मुख्यमंत्री शिंदे यांनी लगावला आहे.

दरम्यान एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांनी दौ-यांचा आणि विकासकामांचा धडाकाच लावला आहे. दररोज दौरे, कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी गणेशोत्सवाच्या काळात अधिकच प्रमाणात वाढलेल्या दिसतायत. त्यावरुन आता ते विरोधकांच्या नजरेतही येऊ लागलेत. याच दौ-यांवरुन अजित पवारांनी केलेल्या टीकेला आता शिंदेंनी उत्तर दिले आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शिंदेंनी यावर भाष्य केलं आहे. तसंच आपलं आतून बाहेर काही करत नाही, जे काही आहे ते बाहेरच उघडपणे करतो, असंही शिंदे स्पष्टपणे म्हणाले आहेत.

विकासकामे दौरे, कार्यकर्त्यांच्या घरच्या भेटी या सगळ्या दरम्यानचे एकनाथ शिंदेंचे फोटो सातत्याने व्हायरल होत होते. या व्हायरल फोटोवरुन विरोधी पक्ष नेते अजित पवारांनी त्यांना चांगलेच सुनावले होते. आम्हीही कामे करतो, पण सगळीकडे कॅमेरे घेऊन फोटो काढत नाही, अशा आशयाचा टोला अजित पवारांनी लगावला होता.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या