22.1 C
Latur
Monday, August 8, 2022
Homeमहाराष्ट्रमुर्मू यांना आमचा जाहीरपणे पाठिंबा होता

मुर्मू यांना आमचा जाहीरपणे पाठिंबा होता

एकमत ऑनलाईन

मुंबई : शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केल्याप्रमाणे आम्ही राष्ट्रपती पदासाठी उभ्या असणा-या एनडीएच्या उमेदवार मुर्मू यांना मतदान केलं आहे. याआधी देखील माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांना पाठिंबा दिला होता. आताही आमचा पाठिंबा होता, असं माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. आज ते मुंबईत बोलत होते.

यावेळी ते म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहिर केलं होत की, कोणत्याही राजकीय पक्षासोबत आमचे राजकीय मतभेद असतील तरी एक महिला उमेदवार म्हणून मुर्मू या निवडणुकीसाठी पुढे आल्या आहेत. आम्ही त्यांना जाहीरपणे समर्थन दिलं असून मतदान केलं आहे. राष्ट्रपती हे सर्व राजकीय पक्षांपेक्षा मोठे पद असते. याआधीही आम्ही प्रतिभा पाटील यांना मतदान केलं आहे. योग्य व्यक्ती म्हणून पांिठबा दिलेला असतो.

आज राष्ट्रपती पदासाठी मतदान होतं आहे. निकालानंतर आदिवासी महिला राष्ट्रपती म्हणून जेव्हा मुर्मू या विजयी होतील तेव्हा या राज्यातील आदिवासी पाड्यांचा विकास होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. यावेळी मध्यप्रदेशातील बस दुर्गटनेसंदर्भात आदित्य ठाकरे म्हणाले की, या अपघातातील लोकांना लवकरात लवकर बाहेर काढण्यात यावं.

मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात झालेल्या एसटी बसच्या भीषण अपघाताची बातमी ऐकताच दु:ख झाले आहे. अपघातग्रस्त कुटुंबांसोबत आमच्या सहवेदना असून जखमी प्रवासी लवकरात लवकर बरे होवोत, अशी प्रार्थना त्यांनी केली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या