24 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeराष्ट्रीयतीन महिन्यांपूर्वीच आम्ही तुम्हाला आस्मान दाखविले

तीन महिन्यांपूर्वीच आम्ही तुम्हाला आस्मान दाखविले

एकमत ऑनलाईन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ठाकरेंना उत्तर
नवी दिल्ली : एकीकडे मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गटप्रमुखांचा मेळावा घेऊन शक्तिप्रदर्शन केले, त्याचवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजधानी दिल्लीत शिंदे गटाच्या गटप्रमुखांचा मेळावा घेऊन शक्तिप्रदर्शन केले. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनीही ठाकरे यांच्यावर टीकेचा बाण सोडला. शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना नोकर समजले किंवा तशी वागणूक दिली तर ती खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा दिला. यावेळी त्यांनी शिवसैनिकांना काय आस्मान दाखविणार, आम्हीच तुम्हाला ३ महिन्यापूर्वी आस्मान दाखविले आहे, असे प्रत्युत्तर मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.

मालकासोबत जाणार की नोकरासोबत, हा पक्ष काही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही. आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना पुढे घेवून जाण्याचे काम करत आहोत. बाळासाहेब ठाकरेंसोबत हजारो कार्यकर्ते आणि शेकडो पदाधिका-यांनी रक्त आणि घाम गाळून शिवसेना उभा केली. त्यांनी पक्षासाठी दिवसरात्र मेहनत करत बलिदान दिले आहे. त्यामुळे तुम्हाला शिवसेना आमची जहागिरी आहे, असे सांगण्याचा अधिकार नाही. बाळासाहेब ठाकरेंचा विचार पुढे नेण्याचे काम आम्ही करत आहोत. त्यामुळे आम्हाला चांगला पाठिंबा मिळत आहे, असा दावाही शिंदे यांनी केला.

म्हणून गटप्रमुखांना चांगले दिवस
अडीच वर्षांनी गटप्रमुखांची आठवण आली, वर्षा-मातोश्रीवर प्रवेश नव्हता. आम्ही क्रांती केली म्हणून गटप्रमुखांना चांगले दिवस आले आहेत, असे एकनाथ शिंदे म्हणाले. खोके वगैरे बोलता, वेळ आली की बोलीन, माझ्यापेक्षा जास्त हिशोब कुणाकडे असेल, हे सगळे महाराष्ट्रात बोलेन, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला.

मिंधे नाही, बाळासाहेबांचे
खंदे लढवय्ये आहोत
आम्हाला मिंधे गट म्हणाले, आम्ही मिंधे नाही बाळासाहेबांचे खंदे लढवय्ये आहोत. सरकार बनवण्यासाठी मिंधेपणा कोणी केला, सरकार बनवण्यासाठी काँग्रस-राष्ट्रवादीसोबत कोण गेले, हे महाराष्ट्र-देश बघतोय. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना आसमान दाखवयाची वेळ येणार नाही, तीन महिन्यांपूर्वी आसमान दाखवले आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या