श्रीनगर: जम्मू काश्मीरमध्ये किश्तवाडच्या गुहेत दहशतवाद्यांनी लपवलेला शस्त्रसाठा आढळला. अनंतनागमध्ये दहशतवाद्याचा घरात स्फोटकांचा साठा सापडला. सुरक्षा पथकाने दोन्ही ठिकाणी कारवाई करुन दहशतवाद्यांची शस्त्रे आणि स्फोटके जप्त केली. जवानांनी वेळेवर केलेल्या कारवाईमुळे घातपात टळला. गुप्तचरांकडून मिळालेल्या माहितीआधारे ही कारवाई करण्यात आली.
मोठ्या दगडांमुळे तयार झालेल्या छोटेखानी गुहेतून शस्त्रांचा साठा
जवान आणि स्थानिक पोलिसांनी संयुक्त कारवाई करुन किश्तवाडमध्ये मोठ्या दगडांमुळे तयार झालेल्या छोटेखानी गुहेतून शस्त्रांचा साठा जप्त केला. यात युद्धात वापरली जाणारी शस्त्र आढळली. गुहेमध्ये एक एके ५६ रायफल, एक अंडर बॅरल ग्रेनेड लाँचर, एक ९ एमएम पिस्तुल, सहा राउंडसह एक पिस्तुलाचे मॅगझिन जप्त करण्यात आले. हा शस्त्रसाठा कोणी लपवला होता याचा शोध पोलीस घेत आहेत.
आदिल मकबूल वानी याच्या घरातून २४ किलो स्फोटके जप्त
अनंतनाग येथे सुरक्षा पथकाने स्फोटकांचा बेकायदा साठा केल्याप्रकरणी चार जणांना अटक केली आणि नानिल भागातील आदिल मकबूल वानी याच्या घरातून २४ किलो स्फोटके जप्त केली. या प्रकरणात आणखी ३ जणांचा शोध पोलीस घेत आहेत. अटक केलेल्यांची कसून चौकशी सुरू आहे.
Read More धक्कादायक ! देशभरात एकाच दिवसात आढळले 9,300 कोरोनाबाधित, तर 260 जणांचा मृत्यू
तब्बल ४५ किलो वजनाचा आयईडी सापडला
काही दिवसांपूर्वी पुलवामा येथे पोलिसांनी नाकाबंदी करुन वाहनांची तपासणी सुरू केली. यावेळी एक दहशतवादी आपले वाहन सोडून पळून गेला. या वाहनात तब्बल ४५ किलो वजनाचा आयईडी सापडला. पोलिसांनी बॉम्ब स्क्वाडच्या मदतीने कार मोकळ्या जागी नेऊन नष्ट केली आणि स्फोटके नियंत्रित स्फोटाद्वारे निकामी केली. या कारद्वारे दहशतवाद्यांनी घातपात केला असता तर मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असते अशी माहिती पोलिसांनी दिली.हंदवाडा पोलिसांनी दहशतवादी संघटना हिजबुल मुजाहिद्दीनला मदत करणाऱ्या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाई दरम्यान पोलिसांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला आहे. अटक केलेल्या दहशतवाद्यांची कसून चौकशी सुरू आहे.
जाळपोळीच्या घटनांना आळा घालण्यात सुरक्षा पथकाला मोठे यश
मागील काही दिवसांत मोठ्या संख्येने दहशतवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा पथकांना यश आले आहे. दहशतवाद्यांचे स्वयंघोषीत कमांडर ठार करुन सुरक्षा पथकाने जम्मू काश्मीरमधील परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. कलम ३७० रद्द झाल्यापासून जम्मू काश्मीरमध्ये परिस्थिती सुधारत आहे. जम्मू काश्मीरमधील दगडफेकीच्या आणि शाळांच्या जाळपोळीच्या घटनांना आळा घालण्यात सुरक्षा पथकाला मोठे यश मिळाले आहे. परिस्थिती सुधारत असल्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
J&K: Indian Army & Kishtwar Police y'day recovered arms, ammunition&warlike stores by busting a terrorist hideout in Chhachchha forest of Kishtwar dist. Recoveries include 1 AK 56 Rifle, 1 Under Barrel Grenade Launcher, one 9mm Pistol, 1 pistol magazine with 6 rounds,among others pic.twitter.com/hm1M66kLl5
— ANI (@ANI) June 3, 2020