16.6 C
Latur
Sunday, January 23, 2022
Homeराष्ट्रीयई-कॉमर्सवरील वेब लिंक खादी आयोगाच्या पुढाकाराने बंद

ई-कॉमर्सवरील वेब लिंक खादी आयोगाच्या पुढाकाराने बंद

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली – ऍमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडील अशा ई-कॉमर्स पोर्टलवरून बनावट खादी उत्पादने विकणाऱ्या 160 वेब लिंक कार्यरत होत्या. खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने पाठपुरावा करून या ई- कॉमर्स कंपन्यांना वेब लिंक हटवण्यास सांगितले आहे.

आयोगाने खादी इंडिया ब्रॅंड नावाचा दुरूपयोग करणाऱ्या 100 कंपन्यांना कायदेशीर नोटीस पाठविली होती. यानंतर खादी ग्लोबल या कंपनीने यासंदर्भातील वेबसाइट बंद केली आहे. त्याचबरोबर ट्‌विटर आणि फेसबुकसह इन्स्टाग्रामवरील पेजेस हलविली आहेत. आणखी दहा दिवसांमध्ये ह्या संदर्भातील काम संपुष्टात येईल, असे सांगण्यात आले.

देशात ‘खादी इंडिया’ नावाने अनेक बनावट स्टोअर्स चालू होती. ही सर्व स्टोअर्स बंद करण्यास सांगण्यात आले आहे. त्यातील काही स्टोअर्स बंद झाली आहेत. ई-कॉमर्स पोर्टलवरून बनावट खादी मास्क, साबण, शाम्पू, सौंदर्यप्रसाधने, मेहंदी, जॅकेट, कुर्ता ही उत्पादने विकली जात होती. यामुळे ही उत्पादने खादी इंडियाची आहेत असा गैरसमज होत होता.

आयोगाची खादी उत्पादने लोकप्रिय होऊ लागल्यानंतर काही व्यक्‍ती आणि कंपन्या याचा गैरफायदा घेण्यासाठी स्वतःची उत्पादने खादी इंडियाची आहेत असे भासवून ग्राहकांना फसविण्याचा प्रयत्न करीत होते. लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना फसविण्यासाठी बऱ्याच प्रकारची फसवी खादी उत्पादने ऑनलाइन उपलब्ध करण्यात आली होती. आता खादी आयोगाच्या पुढाकारामुळे ही विक्री कमी करण्यात यश मिळाले आहे.

बनावट खादी उत्पादने विकणाऱ्या विरोधात खादी आणि ग्रामोद्योग आयोग आगामी काळात मोहीम चालूच ठेवणार असल्याचे आयोगाचे अध्यक्ष विनयकुमार सक्‍सेना यांनी सांगितले. ते म्हणाले की, असे प्रकार घडू नये यासाठी आम्ही एक कायदा विभाग तयार केला आहे. या विभागाचे या संबंधातील घडामोडींकडे लक्ष राहील. यासंदर्भात आयोग न्यायालयीन पाठपुरावाही करीत आहे. त्यामुळे बनावट खादी उत्पादने तयार करून विकण्यास वचक बसणार आहे.

लोहा तालुक्यातील पाच प्राथमिक आरोग्य केंद्र व 29 आरोग्य उपकेंद्राचा कारभार रामभरोसे !

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या