रेणापूर : प्रतिनिधी
रेणापूर शहरातील एकाच समाजातील शिक्षित असलेल्या प्रेमयुगालाचा विवाह पोलिसांच्या मध्यस्थीतेने ठाण्याच्या अवारातच बुधवारी ( दि २७ ) सांयकाळी तहसीलदार यांच्या परवानगीने व मोजक्या लोकांच्या उपस्थित फिजिकल डिस्टंस पाळत पार पडला. या विवाहांने पोलिसतील सामाजिक जाणीव दिसुन आली.
शहरातील रहिवाशी असलेले व शिक्षकांचा मुलगा रोहित (२४ ) तर पशुवैद्यकीय दवाखान्यात कर्मचा-याची मुलगी प्रतीक्षा (२०) यांचा विवाह झाला़ रोहित हा बीएस्सी अॅग्रीचे शिक्षण पूर्ण केलेला तर प्रतीक्षा हिने बी. कॉम. चे शिक्षण पुर्ण केले. हे दोघेही शिक्षीत व शहरातील धनगरगल्ली येथे राहतात. दोघांचे गेल्या दोन ते तीन वर्षापासून प्रेम संबंध दोघांनी लग्न करण्याच्या निर्णय घेतला होता.
कांही दिवसापुर्वी या दोघांच्या प्रेम प्रकरणाची कुणकुण मुलाचे वडील ज्ञानोबा पुजारी यांना लागली तेंव्हा त्यांनी आपला मुलगा रोहित याला समजाविण्याचा प्रयत्न केला मात्र तो त्याला प्रतिसाद देत नव्हता तेंव्हा ज्ञानोबा पुजारी यांनी कांही नातेवाईकांना घेऊन मुलीचे वडील श्रीमंत व्यवहारे यांच्या घरी जाऊन मुला-मुलीच्या प्रेम प्रकरणी हाकीगत सांगितली़ तसेच माझी या दोघांच्या लग्नास हारकत नसुन तुम्ही पण या लग्नास होकार द्यावा आपण यांचे लग्न करू अशी विनंती केली. तेंव्हा मुलीचे वडील या लग्नास तयार झाले मात्र कांही दिवसांनी टाळाटाळ करू लागले़ मुलाच्या वडिलाच्या लक्षात आले.
Read More हॉकी संघाचे गतवैभव परत मिळवून देणारच कर्णधार राणी रामपालचा आत्मविश्वास
या दोन कुंटुबांत लग्नाच्या कारणावरुन तक्रारी होऊ लगल्या दरम्यान याच कारणावरुन दोन्ही कुटुंबात २६ मे २०२० रोजी भांडणे झाले हे भांडण पोलिस ठाण्यापर्यंत गेले तेव्हा दोन्ही कुटुंबांना पोलिसांनी ठाण्यात बोलविले पोलिस निरीक्षक गोरख दिवे, शहराचे बीट जमादार सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक राजकुमार गुळभेले, पोलिस कर्मचारी किरण गंभीरे यांनी भांडणाचे कारण विचारले असता दोन्ही कुंटुबानी सर्व हाकीगत पोलिसांना सांगितली तेंव्हा पोलिसांनी मुला -मुलीला विचारणा केली असता दोघांनी यास होकार दिला.
मुलगा व मुलगी सज्ञान, सुशिक्षीत असल्याने व एकाच समाजातील असल्याने कर्तव्यदक्ष व सामाजिक बांधिलकी जपणारे पोलिस निरिक्षक दिवे, बीट जमादार गुळभेले, पोलिस कर्मचारी गंभिरे यांनी या दोन्ही कुटुंबांना एक दिवस समजाविले तेंव्हा दोन्ही कुटुंबांनी लग्नास होकार दिला. या लग्नास पुन्हा टाळाटाळ होऊ नये, भांडणे होऊ नये ‘नेक काम को देरी क्यों ‘ हे लग्न तात्काळ व पोलिस ठाण्यातच पोलिसांच्या साक्षीने करण्याचे ठरले.
लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर व जिल्हाधिकाºयांच्या आदेशानुसार लगेच पोलिस निरीक्षक दिवे यांनी तहसीलदारांची परवानगी घेत मुला_ मुलीचे आई – वडील, मोजके नातेवाईक व पोलिस कर्मचा-याच्या उपस्थितीत बुधवारी २७ मे रोजी सायंकाळी मुहुर्तावर विवाह झाला, अक्षता, रितीरिवाजाप्रमाणे फिजिकल डिस्टस अंतर पाळत रोहित व प्रतीक्षा यांचा विवाह पोलिस ठाण्याच्या आवारात पार पडला़