25.5 C
Latur
Saturday, September 18, 2021
Homeमहाराष्ट्रसोनियाजींच्या सूचनांचे स्वागतच - खा. संजय राऊत

सोनियाजींच्या सूचनांचे स्वागतच – खा. संजय राऊत

एकमत ऑनलाईन

मुंबई : काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी लिहिलेल्या पत्रासंदर्भात बोलताना संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्र आणि राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी एखादा कार्यक्रम काँग्रेस पुढे आणत असेल, तर त्याचे स्वागतच केले पाहिजे. यात कोणतेही दबावाचे राजकारण नाही, असे म्हणत राऊत यांनी सोनिया गांधींनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रावरून सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना काही दिवसापूर्वी पत्र पाठवून सूचना केल्या आहेत. त्यांच्या या पत्रावरून राज्यात दबाबाचे राजकारण सुरू असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. या चर्चेला आता शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी पूर्ण विराम दिला आहे.
दुर्बल घटकांच्या विकासाचे पाठविले होते पत्र

राज्यातील महाविकास आघाडीचा सहकारी म्हणून, काँग्रेस पक्ष समाजातील दुर्बल घटक, विशेषत: दलित, आदिवासी, ओबीसी आणि इतर उपेक्षित लोकांचे संरक्षण करण्यासाठी वचनबद्ध आहे. महाविकास आघाडी सरकारने वंचित-उपेक्षित वर्गासाठी कल्याणकारी उपक्रम राबवावे, अशी सूचना काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना केली होती.

बीटी तंत्रज्ञानाची कायदेशीर जबाबदारी लवकरच ठरणार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या