26.2 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeमहाराष्ट्रकाय झाडी, काय डोंगर,काय हाटील ... गमतीजमती आणि घोषणाबाजीमुळे गाजली विधानसभा

काय झाडी, काय डोंगर,काय हाटील … गमतीजमती आणि घोषणाबाजीमुळे गाजली विधानसभा

एकमत ऑनलाईन

मुंबई : विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक झाली. यासाठी भाजपाकडून राहुल नार्वेकर रिंगणात होते. तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे राजन साळवी यांना उमेदवारी देण्यात आली होती. यामध्ये भाजपचे राहुल नार्वेकर विजयी झाले. मात्र विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया भाजपच्या विजयामुळे नव्हे तर सदस्यांनी केलेल्या गमतीजमती आणि घोषणाबाजीमुळे गाजली.

जयंत पाटील योग्य म्हणतायेत : फडणवीस
मतदानाच्या सुरुवातीलाच घोळ सुरू झाले. कोणत्या क्रमाने मतमोजणी करायची याबद्दल काही मतभेद दिसले. तेव्हा राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी मतमोजणीचा क्रम कसा असावा याबद्दल एक सूचना केली. तेव्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उभे राहिले आणि त्यांनी जयंत पाटील योग्य म्हणतायंत असे म्हणत दुजोरा दिला.

आदित्य ठाकरे, अमित देशमुखांकडून हटके मतदान
यावेळी शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी मतदानाला उभे राहिल्यानंतर आदित्य रश्मी उद्धव ठाकरे असे नाव घेतले. आमदार अमित देशमुख यांनी देखील अमित वैशाली विलासराव देशमुख असे म्हणत मतदान केले.

रवी राणांकडून हनुमान चालिसाचा उल्लेख
अपक्ष आमदार रवी राणा यांनी मतदानाला उभे राहिल्यानंतर हनुमान चालिसा सोबत घेऊन जय हनुमान म्हटले. मागील काही दिवसांपासून आमदार रवी राणा आणि त्यांच्या पत्नी नवनीत राणा हनुमान चालिसामुळे चर्चेत आहेत. आज पुन्हा एकदा रवी राणा यांनी हनुमान चालिसाचा उल्लेख केला.

काँग्रेस आमदार गोरंट्याल यांचा ‘शेर’
काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल नाव घेताना शेर म्हणत ‘ऐसे कैसे कैसे हो गये, कैसे कैसे ऐसे हो गये’ म्हणत मतदान केले.

‘काय झाडी, काय डोंगर, काय हाटील ओके’
मध्ये ऑडिओ रेकॉर्डिंगमुळे गाजलेले शहाजीबापू पाटील मतदान करण्यासाठी ज्यावेळी उभे राहिले त्यावेळी इतर सदस्यांनी एकच गोंधळ केला. ‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटील’म्हणत इतर सदस्यांनी घोषणाबाजी केली.

मनसे, बविआ भाजपच्या पाठिशी
या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि बहुजन विकास आघाडीने भाजपच्या बाजूने मतदान केले.

सरनाईक, यामिनी जाधव उठताच ईडीच्या घोषणा
विधानसभा अध्यक्षांच्या मतदानाच्या वेळी आमदार उभे राहिल्यानंतर विविध घोषणाबाजी केली. शिंदे गटाचे प्रताप सरनाईक आणि यामिनी जाधव मतदान करण्यासाठी उभे राहताच, ‘ईडी ईडी’ च्या घोषणा देण्यात आल्या.

राम कदम, रोहित पवार नंबर घेताना चुकले
भाजपचे आमदार राम कदम आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार या दोघांनी चुकीचा नंबर घेतला.

जय श्रीरामच्या घोषणा
भाजपचे राहुल नार्वेकर विजयी झाल्यानंतर उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी त्यांचे अभिनंदन केले. तर भाजपच्या सदस्यांनी यावेळी जय श्रीरामच्या घोषणा देत आनंद व्यक्त केला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या