23.4 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeमहाराष्ट्रजे अजितदादांनी केले तेच आता झालेय

जे अजितदादांनी केले तेच आता झालेय

एकमत ऑनलाईन

मुंबई: महाराष्ट्र विधानसभेत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव ठेवण्यात आला. या प्रस्तावावर बोलताना भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला. यावेळी मुनगंटीवार यांनी शिंदे आणि फडणवीस यांचं अभिनंदन केलं. ‘२३ नोव्हेंबरला जे अजितदादांनी केलं तेच आता झालंय’, असं म्हणत मुनगंटीवार यांनी शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला.

‘चांदा चे बांद्याने अडीच वर्षापूर्वी युतीला कौल दिला. पण शिवसेनेनं हिंदुत्वाच्या मुद्यावरील मते मागितलेल्यांना धोका दिला’, असंही मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.

कोण, कधी भाजपात येईल सांगता येत नाही
महाविकास आघाडीतील अर्धे लोक रात्री आम्हाला येऊन भेटतात, असा गौप्यस्फोट मुनगंटीवार यांनी केला. त्यांनी म्हटलं की, यांच्यातील अर्धे लोक रात्री आम्हाला येऊन भेटतात. कुणाचं नाव सांगण्याची गरज नाही. तिकडंच कोण, कधी इकडे येईल काही अंदाज नाही.

बाळासाहेबांचं वचन कुणी मोडलं?
शिवसेनेनं बाळासाहेबांचं वचन मोडलं असं सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी म्हटलं. ज्यांना फक्त खुर्ची माहित आहे, त्यांना त्याग कधी कळणार? बाळासाहेब म्हणाले होते आयुष्यात कधीही काँग्रेससोबत जाणार नाही. बाळासाहेबांचं वचन कुणी मोडलं, हे माहित आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या