मुंबई : एक महिना झाला तरी यांना मंत्रीमंडळाच्या विस्तार करण्यासाठी मुहूर्त मिळेना. का ग्रीन सिग्नल मिळत नाही, एकवाक्यता का होत नाही ते नेमके कशाला घाबरतात हेच आम्हाला कळेना असे वक्तव्य राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले.
राज्यातील १३ कोटी जनता आशेने बघत आहे. अनेकांचे वेगवेगळे प्रश्न आहेत. सचिवांशी बोललो तर ते म्हणतात मंत्री महोदयांच्या रिमार्कची गरज आहे. त्यांचा रिमार्क असल्याशिवाय आम्ही काही करु शकत नाही. त्यामुळे आता कसा कारभार चाललाय ते जनतेन पाहावे असेही पवार यावेळी म्हणाले.
शेतक-यांना तातडीने मदत करावी
पूरग्रस्त भागाचा दौरा करुन मी काही आमदारांसोबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. दुस-या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील भेटलो. पूरग्रस्त भागात शेतक-यांचे अतोनात नुकसान झाले आहे. काही भागात गोगलगायीचे प्रमाण वाढलं आहे. काही शेतकरी आत्महत्या करण्यातपर्यंत पोहोचले आहेत. हे महाराष्ट्रासाठी भूषणावह नाही. त्यामुळे तत्काळ नुकसानग्रस्त शेतक-यांना मदत झाली पाहिजे असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले.
ताबडतोब अधिवेशन बोलावले पाहिजे
राज्यकर्ते बदलत असतात. नवीन येत असतात जुने जात असतात. कोणीही सरकारमध्ये आले तरी कायदा, संविधान नियम याच्या अधिन राहून काम केले पाहिजे असेही अजित पवार यावेळी म्हणाले. अतिवृष्टीनं शेतीचे, घराचे, रस्त्याचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतक-यांना लवकरात लवकर मदत करावी असे अजित पवार म्हणाले.
ताबडतोब अधिवेशन बोलावले पाहिजे. कारण दरवर्षी पावसाळी अधिवेशन हे जुलै महिन्यात घेतलं जातं. आता ऑगस्ट महिना सुरु झाला असल्याचे अजित पवार यावेळी म्हणाले. एक महिना झाला तरी मंत्रीमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळत नसल्याचे अजित पवार यावेळी म्हणाले.
राज्यातल पूरग्रस्त भागात शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. तसेच काही ठिकाणी गोगलगायीचा प्रादुर्भाव होत आहे. पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. काही ठिकाणी मनुष्यहानी देखील झाली आहे. घरे, रस्ते, यांचे देखील नुकसान झालं आहे. पुलांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकान झालेल्या शेतक-यांना, नागरिकांना आधार देण्याची गरज असल्याचे अजित पवार म्हणाले.