22.5 C
Latur
Saturday, November 26, 2022
Homeआंतरराष्ट्रीयव्हॉटस अ‍ॅप सेवा कोलमडली

व्हॉटस अ‍ॅप सेवा कोलमडली

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : जगात संवादाचे सर्वात मोठे माध्यम असलेली व्हॉट्स अ‍ॅप सेवा आज कोलमडली आणि जगभरातल्या अनेक ठिकाणच्या युजर्सचा खोळंबा झाला. मंगळवार दि. २५ ऑक्टोबर दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास व्हॉट्स अ‍ॅप सेवा बंद झाली असून जगात अनेक ठिकाणी व्हॉट्स अ‍ॅप सेवा बंद पडली. व्हॉट्स अ‍ॅपकडून कोणतंही अधिकृत माहिती मिळाली नाही, त्यामुळे जगभरातल्या कोट्यवधी युजर्सचा खोळंबा झाला आहे.

‘लवकरात लवकर व्हॉट्स अ‍ॅप सेवा सुरू करू असं स्पष्टीकरण व्हॉट्स अ‍ॅपकडून देण्यात आले आहे. व्हॉट्स अ‍ॅप डाऊननंतर अनेकजण त्रस्त आहेत. अनेक युजर्सचा खोळंबा झाला आहे. पण नेटकऱ्यांनी मात्र मीम्सचा पाऊस पाडण्यास सुरुवात केली आहे. व्हॉट्स अ‍ॅप डाऊन झाल्यानंतर नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर मीम्स शेअर करण्यास सुरुवात केली आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या