33.5 C
Latur
Monday, March 1, 2021
Home तंत्रज्ञान व्हॉट्सअ‍ॅपचे नवीन फिचर येणार : एकाच वेळी 50 जणांना व्हिडीओ कॉल

व्हॉट्सअ‍ॅपचे नवीन फिचर येणार : एकाच वेळी 50 जणांना व्हिडीओ कॉल

एकमत ऑनलाईन

मुंबई : लवकरच व्हॉट्सअ‍ॅपवर एकाचवेळी 50 जणांना व्हिडीओ कॉल करता येणार आहे. पुढील काही दिवसात व्हॉट्सअ‍ॅपकडून हे फिचर लाँच केले जाणार आहे. याशिवाय व्हॉट्सअ‍ॅपकडून आणखी काही इतर नवनवीन फिचर लाँच केले जाणार आहेत. सध्या व्हॉट्सअ‍ॅप यावर काम करत आहे. नुकतेच व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या युझर्ससाठी डार्क मोड, डिलिट मेसेज फिचर लाँच केले होते

फेसबुकने कोरोना काळात व्हिडीओ कॉलिंगचा वाढता वापर लक्षात घेऊन मेसेंजरवर रुम फिचर लाँच केले होते. तसेच कंपनी आता लवकरच व्हॉट्सअ‍ॅप युझर्ससाठीही रुम फिचर जारी करणार आहे. रुम फिचरच्या माध्यमातून एकावेळेस जवळपास 50 व्हॉट्सअ‍ॅप आणि व्हॉट्सअ‍ॅप वेब युझर्स व्हिडीओ कॉल करु शकणार आहेत. त्यामुळे युझर्सला याचा खूप फायदा होईल, असं कंपनीने म्हटले. व्हॉट्सअ‍ॅप आपल्या युझर्ससाठी लवकरच आणखी एक नवीन फिचर लाँच करणार आहे. ज्याचे नाव मल्टि डिव्हाईस फिचर आहे. या फिचरच्या माध्यमातून युझर्स एक अकाऊंट चार वेगवेगळ्या मोबाईलमधून चालवू शकता. डाटा सिंक करण्यासाठी वाय-फायचा वापर करावा लागणार आहे. या फिचरचा खुलासा वेब बीटा इंफोने केला.

व्हॉट्सअ‍ॅपने नुकतेच लेटेस्ट अँड्रॉईड बीटा व्हर्जनवर 138 नवीन इमोजी जारी केले आहेत. यामध्ये शेफ, शेतकरी आणि पेंटर अशा इमोजींचा समावेश आहे. कंपनीने आतापर्यंत या इमोजीना स्टेबल व्हर्जनसाठी लाँच केले नाही. व्हॉट्सअ‍ॅप आपल्या नवीन फिचर एक्सपायरिंग मेसेजची टेस्टिंग करत आहे. हे फिचर व्हॉट्सअ‍ॅप अँड्रॉईड बीटा व्हर्जन 2.20.197.4 वर स्पॉट केले आहे. युझर्स या फिचरच्या माध्यमातून सात दिवसानंतर सेंड केलेले मेसेज ऑटो डिलिट करु शकतात.

व्हॉट्सअ‍ॅप व्हिडीओ कॉलिंग आणखी उत्कृष्ट करण्यासाठी एक वेगळे बटन जोडले जाणार आहे. या बटनच्या माध्यमातून युझर्स सहज ग्रुपमध्ये व्हिडीओ कॉल करु शकणार आहे. सध्या कंपनीकडून या फिचरबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही.

एक जागीच ठार : मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर कारचा अपघात

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या