चंदिगड : पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आज गुरुवारी पुन्हा विवाहबंधनात अडकले आहेत. पंजाबच्या इतिहासात पदावर असताना लग्न करणारे ते पहिले मुख्यमंत्री ठरले.
चंदिगडमधील मुख्यमंत्री निवासस्थानी ४८ वर्षीय मान यांनी हरियाणातील पिहोवाच्या ३२ वर्षीय डॉ. गुरप्रीत कौर यांच्याशी लग्न केले. सकाळी ११ वाजल्यापासून विधी सुरू झाले होते. मान आणि गुरप्रीत यांच्या कुटुंबाव्यतिरिक्त अरविंद केजरीवाल यांचे कुटुंबीयही लग्नाला उपस्थित राहिले. केजरीवाल यांनी वडिलांचे तर खासदार राघव चढ्ढा यांनी भावाचे विधी पार पाडले.
२०१९ पासून मान कुटुंबाशी ओळख
डॉ. गुरप्रीत कौर या मूळच्या हरियाणातील पिहोवा येथील टिळक कॉलनी येथील आहेत. त्यांनी अंबाला येथील मुलांना मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस पूर्ण केले. सध्या त्या राजपुरा येथे राहतात.
भगवंत यांच्या बहिणीची गुरप्रीत यांच्याशी चांगली मैत्री आहे. त्यामुळे त्यांना पूर्ण मान कुटुंब चांगले ओळखत होते. भगवंत मान आणि गुरप्रीत यांची पहिली भेट २०१९ मध्ये झाली होती. तेव्हा मान संगरूरचे खासदार होते. मान यांच्या सीएम पदाच्या शपथविधी समारंभातही गुरप्रीत दिसल्या होत्या.