26.6 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeराष्ट्रीयमोदी आले तेव्हा रुपया ५० वर होता

मोदी आले तेव्हा रुपया ५० वर होता

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमुल्यन होऊत तो ८० वर गेल्याने काँग्रेस नेते आणि खासदार शशी थरुर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. मोदी जेव्हा सत्तेत आले तेव्हा रुपया ५० रुपयांवर होता आता तो ८० रुपयांवर पोहोचला आहे, अशा शब्दांत त्यांनी सडकून टीका केली.

थरुर म्हणाले, मोदी सत्तेत आले तेव्हा रुपया ५० रुपयांवर होता आता तो ८० रुपयांवर पोहोचला आहे. आता जबाबदारीचा प्रश्न कुठे आहे? तुम्हाला आता प्रत्येक आयातीच्या वस्तूसाठी जास्त पैसे मोजावे लागत आहेत. कारण रुपयाची किंमत घसरली आहे. तसेच इंधनाच्या किंमती वाढल्या आहेत, महागाई वाढत आहे. त्याचबरोबर आता जीएसटीचे अतिरिक्त ओझे सर्वसामान्य माणसावर पडले आहे. रुपया ८० च्या पुढे गेला आहे. मोदीजींनी हा मुद्दा सन २०१४ च्या निवडणुकीचा मुद्दा बनवला. ते सत्तेत आले तेव्हा रुपया मजबूत करणार होते कारण आधीचे सरकार कमकुवत असल्याचे त्यांनी सांगितले होते. मग आत्ताची परिस्थिती काय आहे? ते आपल्याला मजबूत सरकार देत आहेत का? असा सवालही थरुर यांनी विचारला आहे.

पहिल्यांदाच ऐतिहासिक अवमुल्यन
भारतीय चलन असलेल्या रुपयाचे आज डॉलरच्या तुलनेत पहिल्यांदाच ऐतिहासिक अवमुल्यन झाले. आज (१९ जुलै २०२२) रुपया डॉलरच्या तुलनेत ८०.०५ रुपयांवर पोहोचला. गेल्याकाही दिवसांपासून रुपयाच्या मुल्यात सातत्याने पडझड सुरु आहे. रुपयाचे मुल्य घसरल्याने आपल्याला आयात कराव्या लागणा-या गोष्टी जास्त पैसे देऊन खरेदी कराव्या लागतात.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या