नॉर्फ्लॉक येथे काम करीत असलेली आरोग्य कर्मचारी न सांगता नऊ आठवड्यांनी आपल्या मुलींना भेटायला घरी परत आले, तेव्हा घडलेल्या प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
सध्या कोरोना विषाणूच्या साथीने जगभरात थैमान घातले आहे त्यामुळे अनेक आरोग्य कर्मचा-यांना आपल्या कुटूंबापासून दूर रहावे लागत आहे व आपली सेवा बजावावी लागत आहे.
अशीच एक घटना, ब्रिटनमधील नॉरफोक येथील आरोग्य कर्मचारी जेंव्हा 9 आठवड्यांनंतर तिच्या घरी परत आली तेव्हा घडलेला प्रसंग तिच्या मुलींना आपल्या आईला भेटून झालेला आनंद, मुलींच्या डोळयातील आनंदाश्रू या सर्व घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Read More अखेर हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन औषधाच्या ट्रायलवरील बंदीची शिफारस मागे
सूजी वॉन या आरोग्य कर्मचारी महिलेचे नाव असून ती नॉरफोकच्या किंग्ज लिनच्या क्वीन एलिझाबेथ हॉस्पिटलमधे कार्यरत आहे. कोविड -१९ च्या रूग्णांची काळजी घेण्यासाठी ती आपल्या घरापासून ९ आठवडे दूर होती. तिला 7 वर्षांची हेट्टी आणि 9 वर्षाची बेला आहेअशा दोन मुली आहेत.
Susie is an ODP at the Queen Elizabeth Hospital in Kings Lynn. As she has been working in a Covid ward her daughters Bella (9 )and Hettie (7) went to live with their Auntie to keep them safe. They haven’t seen their mum for 9 weeks, until today. @Lottsoflove21 #ourprideofbritain pic.twitter.com/TZTwLNoEwL
— Pride of Britain (@PrideOfBritain) June 2, 2020