26.9 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeमहाराष्ट्रकंत्राटी आहोत की पर्मनंट ते लवकरच कळेल; गोगावलेंचे ठाकरेंना प्रत्युत्तर

कंत्राटी आहोत की पर्मनंट ते लवकरच कळेल; गोगावलेंचे ठाकरेंना प्रत्युत्तर

एकमत ऑनलाईन

मुंबई : कंत्राटी कामगारांप्रमाणेच राज्याचे मुख्यमंत्रीही कंत्राटी आहेत. आपण त्या पदावर किती काळ राहणार हे त्यांनाच माहीत नाही, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. त्यानंतर आम्ही कंत्राटी आहोत की पर्मनंट ते लवकरच कळेल अशा शब्दांत गोगावले यांनी त्यांना प्रत्युत्तर देत आदित्य ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

दरम्यान पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस असून मागचे पाचही दिवस सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये गोंधळ पहायला मिळाला होता. बुधवारीही सभागृहाच्या पाय-यांवर आमदारांची धक्काबुक्की झाली. त्यानंतर आज सत्ताधारी भाजप-शिंदे गटाने आदित्य ठाकरेंवर टीका करणारे पोस्टर घेऊन घोषणाबाजी केली.

यामध्ये ‘‘युवराजांची कायमच ‘दिशा’ चुकली’’ असा आशय टाकत डिवचले आहे. त्यानंतर, प्रत्येकाने आपापली मर्यादा राखली पाहिजे, आमच्या अंगावर आले तर आम्ही काय गप बसणार का? अशा शब्दांत शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी विरोधकांचा समाचार घेतला आहे.

त्यांनी तीन दिवस घोषणाबाजी केली, आम्ही दोन दिवसच केली. ती त्यांच्या वर्मी लागलेली आहे. प्रत्येकाने आपापली मर्यादा राखली पाहिजे, आमच्या अंगावर आले तर आम्ही काय गप्प बसणार का? प्रत्येकाने आपापली मर्यादा राखली पाहिजे. आमची चूक दाखवा आम्ही माफी मागू पण विनाकारण डिवचले तर आम्ही खपवून घेणार नाही, आम्हाला डिवचण्याचा प्रयत्न करू नका, अशा शब्दांत गोगावले यांनी आज विरोधकांना सुनावल.े

त्याचबरोबर शिंदे गटाच्या आमदारांनी आदित्य ठाकरे यांचे पोस्टर घेऊन सभागृहाच्या पाय-यावर घोषणा दिल्या. त्यामध्ये युवराजांची दिशा कायमच चुकली आहे असा आशय लिहिला होता. त्यावर बोलताना गोगावले म्हणाले, जी वस्तुस्थिती आहे तीच आम्ही मांडली, काल त्यांनी जो प्रकार केला तो निंदनीय आहे. आम्ही मर्द आहोत आमच्या नादाला लागायचे नाही, असेही गोगावले म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या