Wednesday, September 27, 2023

जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा : कोरोनाचा धोका अजून टळलेला नाही

नवी दिल्ली – कोरोनाचा धोका टळला आहे असे मानून जगभरातील बहुतेक देश लागू असलेला लॉकडाऊन शिथिल करत आहेत. पण त्यातच आता जगभरात कोरोनाची परिस्थिती बिघडत चालल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. त्याचबरोबर यासंबंधी आपण इशारा देखील दिला होता, असेही आरोग्य संघटनेने म्हटले आहे. सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांची नोंद सोमवारी झाली असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे. सध्या कृष्णवर्णीय नागरिक जॉर्ज फ्लॉयड यांच्या मृत्यूवरुन अमेरिकेत आंदोलने सुरु असून सुरक्षेची सर्व काळजी घ्या असा जागतिक आरोग्य संघटनेने आंदोलनकर्त्यांना सल्ला दिला आहे. AFP ने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

यासंदर्भातील वृत्त एएफपी या वृत्तसंस्थेने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार जगभरात आतापर्यंत कोरोनामुळे चार लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून जवळपास ७० लाख लोकांना लागण झाली आहे. चीनमधून डिसेंबर महिन्यात कोरोनाचा फैलाव होण्यास सुरुवात झाली होती. कोरोनाचे पूर्व आशियानंतर युरोप हे केंद्रबिंदू ठरले होते. पण आता अमेरिकेने सर्वांना मागे टाकल्याचे चित्र आहे. युरोपमध्ये परिस्थती सुधारत असली तरी जागतिक स्तरावर ती बिघडत चालली आहे अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस एडहानोम यांनी जिनावा येथील पत्रकार परिषदेत दिली.

Read More  राखेतून कोळसा तयार करण्यात यश : संशोधनासाठी सरकारकडून पेटंट

कोरोनाची १ लाख प्रकरणे गेल्या १० दिवसांत समोर आली आहेत. रविवारी जवळपास १ लाख ३६ हजार लोकांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाली आहे. एका दिवसातील आतापर्यंतची ही सर्वाधिक आकडेवारी आहे. जी आकडेवारी रविवारी समोर आली त्यामधील ७५ टक्के रुग्ण हे एकूण १० देशांमधील होते. यामध्ये अमेरिका आणि दक्षिण आशियाची आकडेवारी सर्वाधिक असल्याचेही त्यांनी सांगितले. टेड्रोस पुढे म्हणाले की, ज्या देशांमधील परिस्थिती सुधारत आहे, तिथे आत्मसंतुष्ट असणे हा सर्वात मोठा धोका आहे. कोरोनाचा धोका अद्यापही टळलेला नाही. जवळपास सहा महिने महामारीला झाले आहेत. यामधून कोणत्याही देशाने लगेच बाहेर पडणे योग्य नाही.

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या