Tuesday, September 26, 2023

WHO ने दिला इशारा : …कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सामोरे जावे लागेल

अंतरराष्ट्रीय : जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) आपत्कालीन संचालक डॉक्टर माइक रायन यांनी कोरोनाबाबत इशारा दिला आहे. आज अनेक देश लॉकडाऊन काढत आहेत. त्यामुळे भविष्यात कोरोनाची अजून एखादी लाट येण्याची शक्यता असल्याचे रायन यांनी म्हंटले आहे. त्यामुळे कोणत्याही देशाने लॉकडाऊन उठवण्याची घाई करू नये नाहीतर आणखी परिणामांना सामोरे जावे लागेल. तर ज्या देशांनी लॉकडाऊन काढला आहे, अशा देशांनी आता विशेष काळजी घेणे आवश्यक आहे, असे रायन म्हणाले.

नेमकं रायन म्हणाले की, काही देशांमध्ये करोनाची प्रकरणं कमी होत असली तर मध्य आणि दक्षिण अमेरिका, दक्षिण आशिया आणि आफ्रिका येथे ही संख्या वाढत आहे. सध्या जग करोनाच्या पहिल्या लाटेत असून कोणत्याही क्षणी संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता असल्याने सरकारने ठाम राहणं गरजेचं आहे.

Read More  12 हजार रुपये पेंशन : एलआयसीने सुरू केली बंद झालेली सरकारची ही योजना

यन यांनी करोना टप्प्याटप्प्याने येत असल्याचा इशारा दिला आहे. माइक रायन यांनी युरोप आणि नॉर्थ अमेरिका जिथे निर्बंध शिथील करण्यात आले आहेत आणि सर्वसामान्य जीवन सुरळीत होत आहे त्यांनाही लोकांच्या सुरक्षेसाठी सर्व काळजी घेण्यास सांगितलं आहे. जेणेकरुन करोनाची दुसरी लाट टाळता येईल.

करोना कोणत्याही क्षणी पुन्हा एकदा वाढू शकतो. करोनाची प्रकरणं कमी झाली याचा अर्थ त्याचा प्रभाव आता कमी होत जाईल आणि आपल्याकडे दुसरी लाट येण्याआधी तयारीसाठी खूप वेळ आहे असा विचार करणं चुकीचं ठरेल. करोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर एका महिन्यात तो पुन्हा वाढू शकतो, असे रायन म्हणाले.

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या