23.7 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeमहाराष्ट्रकोण होणार भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष?; शेलार, राम शिंदेंच्या नावांची चर्चा

कोण होणार भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष?; शेलार, राम शिंदेंच्या नावांची चर्चा

एकमत ऑनलाईन

मुंबई : भाजपा प्रदेशाध्यक्षपदासाठी नव्या चेह-याला संधी मिळण्याची शक्यता असून, यासाठी आशिष शेलार आणि राम शिंदे यांच्या नावाची चर्चा आहे. चंद्रकांत पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यास भाजपा प्रदेशाध्यक्षपदी नव्या चेह-याची वर्णी लागण्याची शक्यता आहे.

राज्यात नव्याने स्थापन झालेल्या शिंदे सरकारचा मंत्रिमडंळ विस्तार येत्या आठवडाभरात होण्याची शक्यता आहे. यामध्ये भाजपचे सध्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान दिले जाऊ शकते. असे झाल्यास भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी नव्या चेह-याला संधी दिली जाऊ शकते. त्यासाठी आशिष शेलार आणि राम शिंदे यांच्या नावाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

राम शिंदे नुकतेच विधान परिषदेच्या निवडणुकीत निवडून आले आहेत. त्याशिवाय त्यांनी याआधी भाजपची प्रमुख खाती आणि पदं सांभाळली आहेत. चंद्रकांत पाटलांचा प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यकाळ येत्या फेब्रुवारीमध्ये संपणार आहे. त्यामुळे या पदावर जर नव्या चेह-याची वर्णी लागली तर, मुंबई महापालिकेच्या निवडणुका पार पडल्यानंतर त्यांचा कार्यकाळ फेब्रुवारीपासून सुरू होऊ शकतो अशी चर्चा आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या