28 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeमहाराष्ट्रज्याची शिवसेना त्याचाच दसरा मेळावा

ज्याची शिवसेना त्याचाच दसरा मेळावा

एकमत ऑनलाईन

मुंबई : शिवसेनेचा दसरा मेळावा होणार की नाही, याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले असतानाच आता या वादात बच्चू कडू यांनी उडी घेतली आहे. बच्चू कडू यांनी या मुद्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बाजू घेतली आहे.

सुप्रीम कोर्टात निकाल शिंदे गटाच्या बाजूनेच लागणार, असा विश्वास आमदार आणि शिंदे गटाचे नेते बच्चू कडू यांनी व्यक्त केला आहे.
ते पुढे म्हणाले, धनुष्यबाण हे चिन्ह गोठवल्यानंतर अधिक संभ्रम निर्माण होईल. दसरा मेळाव्यावरही त्यांनी मत व्यक्त केले आहे. ज्याची शिवसेना त्याचा दसरा मेळावा, असे ते म्हणाले.

एकनाथ शिंदे साहेबांची सेना आहे म्हणून एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा होणार आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत पडलेल्या दोन गटांमुळे शिवतीर्थ अर्थात दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर होणारा दसरा मेळावा कोण घेणार, यावर बरीच चर्चा रंगत आहे. मात्र, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार असल्याचा निर्धार केला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या