26.2 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeमहाराष्ट्र५० बंडखोर आमदारांना सोबत घेऊन गुवाहाटीत का बसलाय?

५० बंडखोर आमदारांना सोबत घेऊन गुवाहाटीत का बसलाय?

एकमत ऑनलाईन

मुंबई : बंडखोरांचा आत्मा मेला असून आता फक्त त्यांची प्रेत उरली आहेत. सगळेच जवळेचे आता गद्दार झाले आहेत त्यामुळे मंत्री उदय सामंत यांच्या जाण्याने सेनेला कोणताही धक्का बसलेला नाही. बाप बदलण्याची भाषा आधी गुलाबराव पाटील यांनी केली होती.

बंडखोरांचा मराठी भाषेची संपर्क तुटलेला असल्याने माझ्या भाषणाचे चुकीचे अर्थ काढले जात आहेत, असं वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. आज ते मुबंईत बोलत होते. तुमच्या जास्तीचा आकडा आहे मग, ५० बंडखोर आमदार सोबत गुवाहटीत का बसलाय? असा सवालही राऊतांनी शिंदे गटाला केला आहे.

माध्यमांशी संवाद साधताना राऊतांनी बंडखोर आमदारांना इशारा दिला आहे. ते म्हणाले, सध्या राज्यातील जनता संतापली आहे. हा संताप कोणीही रोखू शकणारी नाही.

सेनेतील सगळे जवळचे गद्दार झाले असल्यो आता आत्मा मेलेल्यांकडून कसली अपेक्षा करायची असा सवालही त्यांनी बंडखोरी आमदारांना केला आहे. सगळेच जवळचे गद्दार झाले आहेत त्यामुळे सामंताच्या जाण्याने धक्का बसला नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या