19 C
Latur
Tuesday, November 29, 2022
Homeप्रत्येक प्रकल्प गुजरातलाच का जातो ?

प्रत्येक प्रकल्प गुजरातलाच का जातो ?

एकमत ऑनलाईन

मुंबई : जर प्रकल्प आसामला गेला असला तर मला बरं वाटलं असतं. पण जो तो प्रकल्प गुजरातला का जातो?
असा सवाल करत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान महाराष्ट्रातील एकूण ५ प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे शिंदे सरकारची मोठी नाचक्की झाली आहे. विरोधकांनी शिंदे सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. राज ठाकरे यांनीही ‘ मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत.

प्रत्येक राज्य त्यांना मुलाप्रमाणे असले पाहिजे. जर प्रकल्प आसामला गेला असला तर मला बरे वाटले असते पण जो तो प्रकल्प गुजरातला का जातो? मग माझ्या भूमिकेबदल संकोच का आहे? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थितीत केला.

पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले,
असे प्रकल्प इतर राज्यात गेले तर देशाचा विकास होईल. गुजरातमध्ये फार चांगल्या सोयी आहेत असं काही नाही आहे, पण राज्यात पण चांगल्या सोयी सुविधा आहेत, असंही राज ठाकरे म्हणाले.

दिवाळीच्या निमित्ताने शिवतीर्थावर दिपोत्सवाचे उदघाट्न होते. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस आले होते. यावर बोलताना ते म्हणाले, मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्री यांना बोलावले तर गैर काय आहे. मी जर कुठल्या कलाकाराला बोलावले तर मग मी चित्रपट क्षेत्रात जाणार का? असे म्हणत राज ठाकरेंनी महायुतीच्या चर्चेवर बोलण्याचं टाळलं.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या