26.9 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeऔरंगाबादराज ठाकरेंविरोधात राजद्रोहाचा आरोप का नाही?

राज ठाकरेंविरोधात राजद्रोहाचा आरोप का नाही?

एकमत ऑनलाईन

औरंगाबाद : चिथावणीखोर भाषण केले म्हणून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर औरंगाबाद पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र, राज ठाकरेंवर जे गुन्हे दाखल केले आहेत, त्याला एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी विरोध केला आहे. मी खासदार नवनीत राणांचे समर्थन करत नाही. पण नवनीत राणांविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल होऊ शकतो तर मग राज ठाकरेंवर तोच गुन्हा दाखल का होऊ शकत नाही, असा सवाल खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे.

तीन दिवस भाषण तपासल्यानंतर पोलिसांनी थातूरमातूर गुन्हे का दाखल केले? थेट बोळा कोंबा, आवाज बंद करा आणि होऊन जाऊ द्या एकदाचे अशी भाषा राज ठाकरे यांनी वापरली. ही भाषा चिथावणीखोर नाही का? असा सवाल करतानाच केवळ आपला भाऊ आहे म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला नाही का? असेही जलील म्हणाले आहेत. नवनीत राणा आणि त्यांच्या पतीला तुरुंगात टाकले आहे.

त्यात काय वेगळं आहे हे आम्हाला सरकार आणि पोलीस प्रशासनाने समजून साांगावे. नवनीत राणा मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर हनुमान चालिसा म्हणायला येणार होत्या हा देशद्रोह आणि हजारो लोकांसमोर जाती धर्मात तेढ निर्माण करणारी वक्तव्ये करणे, लोकांना दंगल करण्यास प्रवृत्त करणे आणि देशाला कमजोर करण्याचे प्रयत्न करणे हा देशद्रोह नाही का? दोन्ही प्रकरणात वेगवेगळी सेक्शन का लावली? पोलिसांना विनंती आहे की, तुम्ही तुमची जबाबदारी पार पाडा. मुस्लिम समुदायांना विनंती आहे की, तुम्ही पोलिसांवर विश्वास ठेवा. त्यांना वेळ द्या, असे इम्तियाज जलील म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या