24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeमहाराष्ट्रशिंदे सरकारवर ३०२ चे गुन्हे का दाखल करू नये?

शिंदे सरकारवर ३०२ चे गुन्हे का दाखल करू नये?

एकमत ऑनलाईन

बीड : ‘ शिंदे सरकार बुलेट ट्रेनमध्ये अडकले आहे. सरकारला शेतकरी आत्महत्येचं काही घेणे देणे नाही. या सरकारवर शेतकरी आत्महत्येबद्दल गुन्हा का दाखल करू नये?’ असे म्हणत विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी एकनाथ शिंदे सरकारवर निशाणा साधला.

विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे आज बीड जिल्हा दौ-यावर आहे. यावेळी समनापुर इथल्या आत्महत्याग्रस्त शेळके कुटुंबीयांची भेट घेतली. नवनाथ शेळके या शेतक-याने विष प्राशन करून आत्महत्या केली होती. त्यांच्या कुटुंबाची भेट घेत आंदोलन केले. यावेळी माध्यमांशी साधलेल्या संवादादरम्यान दानवे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

‘जो तो ज्याच्या त्याच्या नादात असून सत्तेत बसलेल्या लोकांना याच काही घेणं देणं नाही. काही लोक मुंबई, ठाणे पुण्यात अडकून बसले आहे. शेतकरी आत्महत्येवरून राज्य सरकारवर ३०२ चे गुन्हे का दाखल करू नये, असा परखड सवाली दानवेंनी उपस्थितीत केला.

एक झेंडा आणि एक मैदान
यावेळी दसरा मेळाव्यावरून त्यांना प्रश्न विचारला असता, दानवे म्हणाले की, दसरा मेळावा ही शिवसेनेची परंपरा आहे. एक नेता एक झेंडा आणि एक मैदान हे आमचे घोषवाक्य असून बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केलेली ही परंपरा कायम सुरूच राहणार असून शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होईल असं देखील यावेळी अंबादास दानवे यांनी ठणकावून सांगितलं.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या