मजुरांचे प्रचंड हाल : हाताला काम नसल्याने उपासमारीने जीव जाण्यापेक्षा हे मजूर आपल्या प्रांताकडे पायी निघाले आहेत
लखनौ – कोरोना विषाणू संकटाचा सामना करण्यासाठी सध्या देशव्यापी लॉक डाऊन लागू करण्यात आला असून यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ठप्प झाली आहे. कोरोना विषाणू संकटाला अटकाव करण्यासाठी देशव्यापी लॉक डाऊन अत्यावश्यक असले तरी यामुळे हातावर पोट असलेल्या मजुरांचे मात्र प्रचंड हाल होताना दिसतायेत. हाताला काम नसल्याने उपासमारीने जीव जाण्यापेक्षा हे मजूर आपल्या प्रांताकडे पायी निघाले आहेत.
उत्तर प्रदेश सरकारने त्यांची मदत करायला हवी
अशातच आज काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी पायपीट करत गावी निघालेल्या मजुरांबाबत दुःख व्यक्त केलं आहे. याबाबत त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून ट्विट करत मजुरांना सहन कराव्या लागत असलेल्या यातना मांडल्या असून उत्तर प्रदेश सरकारने त्यांची मदत करायला हवी अशी अपेक्षा देखील व्यक्त केली आहे.
व्यवस्थेने त्यांना वाऱ्यावर सोडून दिलंय
आपल्या ट्विटमध्ये त्या लिहतात, ‘मेच्या उन्हामध्ये मजूर आपल्या मुलाबाळांसह रस्त्याने चालत निघालेत. त्यांना पाहून असं वाटतंय की व्यवस्थेने त्यांना वाऱ्यावर सोडून दिलंय. रोज होणाऱ्या अपघातांमध्ये या मजुरांना आपले प्राण गमवावे लागतायेत. उत्तर प्रदेश परिवहनच्या २० हजार बस पडून असतानाही या मजुरांच्या नशिबी पायपीट का? सरकारने या मजुरांना मदत करावी. काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता या कठीण प्रसंगी मजुरांसोबत आहे. मी पोलीस दलातील माझ्या बांधवाना विनंती करते की त्यांनी पायपीट करणाऱ्या या मजुरांशी सहानुभूतीपूर्वक वर्तन करावे.’
..रोज ये गरीब हिंदुस्तानी मारे जा रहे जा रहे हैं। इनके लिए सरकार बसें क्यों नहीं चलवा रही? यूपी रोडवेज की बीस हज़ार बसे खड़ी हैं। कृपया इन्हें सड़कों पर उतार दीजिए। इन्हीं के श्रम से हमारे ये महानगर बने हैं, इन्हीं के श्रम से देश आगे बढ़ा है। 2/4
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) May 14, 2020