22.4 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeराष्ट्रीय३० कोटी विमाधारकांच्या विश्वासाचे मुल्य कमी का?

३० कोटी विमाधारकांच्या विश्वासाचे मुल्य कमी का?

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : काँग्रेसने मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल करत मोदी सरकार एलआयसी विकत असून हे अतिशय दुर्भाग्य असल्याचे म्हटले आहे. यावेळी ३० कोटी पॉलिसी धारकांच्या विश्वासाचे मूल्यांकन कमी का आहे? असा सवाल देखील काँग्रेसतर्फे उपस्थित करण्यात आला आहे. बुधवारी दि.४ रोजी एलआयसीचा आयपीओ लाँच केला जाणार आहे त्यापूर्वी हा हल्लाबोल करण्यात आला आहे.

एलआयसी १४ लाख लोकांना रोजगार देत असून, यामुळे १२० कोटी लोक प्रभावित होत असल्याचे म्हटले आहे. ‘ज्ािंदगी के साथ भी, ज्ािंदगी के बाद भी’ म्हणत एवढी घाई का? असा सवाल उपस्थित करत ३० कोटी एलआयसी पॉलिसी धारकांच्या विश्वास आणि आत्मविश्वासाची किंमत इतकी कमी का? असा प्रश्नदेखील
सुरजेवाला यांनी ट्वीट करत सरकारला विचारला आहे. विमा कंपनी लाइफ इन्शुरन्स कंपनीने अधिकृतपणे आयपीओ जाहीर केला असून, एलआयसीचा हा आयपीओ ४ मे ते ९ मे या कालावधीत सर्वसामान्यांसाठी खुला होणार आहे.

दरम्यान, विमा क्षेत्रातील प्रमुख कंपनी एलआयसीने मंगळवारी सांगितले आहे की, आयपीओ लॉच्ािंगच्या एका दिवसाआधी मुख्यत: देशांतर्गत संस्थांच्या नेतृत्वाखालील अँकर गुंतवणूकदारांकडून ५,६२७ कोटींपेक्षा जास्त रक्कम गोळा केल्याचे म्हटले आहे. तर, दुसरीकडे भारतीय बाजारपेठेतील सर्वात मोठा आयपीओ असल्याचे सांगत यातील ३.५ टक्के स्टेक कमी करून २१,००० कोटी उभारण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या