22.1 C
Latur
Sunday, August 14, 2022
Homeमहाराष्ट्रनिवडणुकीत पंतप्रधान मोदींचे फोटो का लावले?; उद्धव ठाकरेंना भाजपचा सवाल

निवडणुकीत पंतप्रधान मोदींचे फोटो का लावले?; उद्धव ठाकरेंना भाजपचा सवाल

एकमत ऑनलाईन

मुंबई : माझ्या वडिलांचे फोटो लावू नका असे म्हणता, पंतप्रधान मोदी तर तुमचे वडील नव्हते मग निवडणुकीत त्यांचे फोटो का लावले? असा परखड सवाल भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना विचारला आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची घेतलेली मुलाखत सध्या चर्चेत आहे. राऊतांनी अनेक सवाल उपस्थित केले. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी ठाकरे आणि शिवसेना हे नातं तोडून दाखवा. मात्र ते करताना माझ्या वडिलांचे फोटो लावून मते मागू नका, असे आव्हान केले.

हाच मुद्दा पकडत सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ‘‘कौटुंबिक मुलाखत द्यायची आणि इतरांना गद्दार म्हणायचं. २०१९ च्या निकालानंतर तुमच्याबाबत जनता हेच बोलत होती. माझ्या वडिलांचे फोटो लावू नका असे म्हणता, पंतप्रधान मोदी तर तुमचे वडील नव्हते मग निवडणुकीत त्यांचे फोटो का लावले?’’ असा परखड सवाल भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरेंना केला.

तसेच, सूडाचं राजकारण नको म्हणता मग देवेंद्र फडणवीसांना नोटीस, राणेंवर अजामीनपात्र गुन्हा दाखल केला. खासदार नवनीत राणा यांनी हनुमान चालीसा पठण करणार नाही असे म्हटले तरी १४ दिवस जेलमध्ये टाकलं, सोशल मीडियावर पोस्ट केली म्हणून माजी सैनिकांचा डोळा फोडायचा, स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत अपमानास्पद भाष्य काँग्रेसने करूनही तोंडाला फेव्हिकॉल लावून गप्प बसायचं, असा टोलाही भाजपाने उद्धव ठाकरेंना लगावला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या