22.7 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeमहाराष्ट्रअकोल्यात विधवांनी साजरी केली वटपौर्णिमा

अकोल्यात विधवांनी साजरी केली वटपौर्णिमा

एकमत ऑनलाईन

अकोला : समाजातील अनिष्ट रूढी, परंपरांना झुगारत अकोल्यात विधवांनी वटपौर्णिमा साजरी करत वडाच्या झाडाचे पूजन केले. वटपूजन करताना अनेक महिला भावूक झाल्या होत्या तर काहींना अश्रू अनावर झाले होते.

आजही विधवांना प्रथमत: घरातून आणि समाजातून अनेक मर्यादांना सामोरे जावे लागते. आजही विधवांचे वटपौर्णिमा पूजन समाजात मान्य नाही. त्यामुळे या महिला वड पूजनासाठी पुढाकार घेत नाहीत किंवा त्यांना घेऊ दिला जात नाही. अशा गंभीर परिस्थितीत अकोल्यात वीरस्त्री स्व. लताताई देशमुख प्रेरित स्वामिनी विधवा विकास मंडळाने समाजातील या प्रवाहाविरुद्ध लढा दिला अन् या अनोख्या उपक्रमाला सुरुवात केली. ही संस्था गेल्या १२ वर्षांपासून विधवा महिलांसाठी वटपौर्णिमा पूजनाचे आयोजन करीत आहे.

विधवांच्या सन्मानार्थ झालेल्या वट पूजनासाठी स्वामिनीच्या सचिव सुनीता डाबेराव व जिल्हाध्यक्षा साधना पाटील यांच्या नेतृत्वात अनेक महिलांनी पुढाकार घेतला अन् वटपौर्णिमा पूजन करून विधवांना शुभेच्छा दिल्या.
अनेक महिला झाल्या भावूक
समाजातून मान्यता नसतानासुद्धा अनिष्ट सामाजिक बंधनांना झुगारत सुरू असलेल्या या समाज सुधारणेबाबत उपस्थित विधवा महिलांनी यावेळी आभार व्यक्त केले. या दरम्यान, अनेक विधवा वडपूजन करताना भावूक झाल्या होत्या.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या