26.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeमहाराष्ट्रयाच आठवड्यात सगळ्या जिल्ह्यांना पालकमंत्री मिळणार?

याच आठवड्यात सगळ्या जिल्ह्यांना पालकमंत्री मिळणार?

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होऊन आता जवळपास तीन महिने लोटले आहेत. मात्र अद्याप खातेवाटप पूर्ण झालेले नाही. तसेच अजूनही राज्यातल्या कोणत्याही जिल्ह्याला पालकमंत्री मिळालेला नाही. त्यावरून विरोधकांकडून टीका केली जात असतानाच आता सर्व जिल्ह्यांना पालकमंत्री मिळणार असल्याची माहिती हाती येत आहे.

याच आठवड्यात महाराष्ट्रातल्या सगळ्या म्हणजे ३६ जिल्ह्यांना पालकमंत्री मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. औरंगाबादच्या पालकमंत्रिपदावरून या नियुक्त्या खोळंबल्या होत्या. अतुल सावे की संदीपान भुमरे कोण पालकमंत्री होणार, असा प्रश्न होता. मात्र आता हे पद शिंदे गटाकडे जाणार आहे. संदीपान भुमरे औरंगाबादचे नवे पालकमंत्री असणार आहेत. त्यामुळे आता हा तिढा सुटला आहे.

कॅबिनेट मंत्र्यांना किमान दोन जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात येईल. त्यानंतर दुस-या टप्प्यातला विस्तार झाल्यावर राज्यमंत्र्यांनाही जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात येणार आहे. याच आठवड्यात पालकमंत्री घोषित होणार आहेत. पालकमंत्र्याअभावी जिल्ह्यातली महत्त्वाची कामे खोळंबली होती. विरोधकांकडूनही या मुद्यावरून टीका केली जात होती. मात्र आता हा तिढा सुटल्याचे स्पष्ट झाले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या