24.4 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeमहाराष्ट्रमुख्यमंत्री शिंदे शासकीय महापूजेला मुकणार? राज्य निवडणूक आयोगाला मागितली परवानगी

मुख्यमंत्री शिंदे शासकीय महापूजेला मुकणार? राज्य निवडणूक आयोगाला मागितली परवानगी

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्यात सत्तानाट्य सुरू असताना यंदा आषाढी एकादशी दिवशी विठ्ठलाची शासकीय महापूजा कोण करणार? या प्रश्नाची चर्चा होतीच. दहा दिवसांच्या नाट्यमय घडामोडींनंतर अखेर शिवसेनेचे एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहेत. मात्र मुख्यमंत्री होऊनही एकनाथ शिंदे शासकीय महापूजेला मुकणार का, असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या दिल्ली दौ-यावर आहेत. हा दौरा संपवून ते आजच शासकीय महापूजेसाठी पंढरपुरात जाणार आहेत. एकादशी दिवशी पहाटे ते शासकीय महापूजा करतील. मात्र या सगळ्या दरम्यान राज्यातल्या नगरपालिका निवडणुका जाहीर झाल्याने आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना पंढरपूर दौ-यासाठी निवडणूक आयोगाची परवानगी घ्यावी लागणार आहे.

ही परवानगी मिळाली तरच एकनाथ शिंदेंना शासकीय महापूजेसाठी पंढरपुरात जाता येणार आहे. जिल्हा प्रशासनाने याबाबत राज्य निवडणूक आयोगाला पत्र लिहिलेले आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या दौ-यासाठी परवानगी मिळाली की नाही, याबाबत अद्याप कोणतीही माहिती हाती आलेली नाही. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे शासकीय महापूजा करणार की नाही, हे आता निवडणूक आयोगाच्या हातात असणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या