24.7 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeआधी शिक्षण पूर्ण करणार !

आधी शिक्षण पूर्ण करणार !

एकमत ऑनलाईन

सायकल स्टार ज्योतीचा फेडरेशन आॅफ इंडियाला नकार

नवी दिल्ली : लॉकडाउन काळात आपल्या जखमी वडिलांना सायकलच्या मागच्या सीटवर बसवून गुरुग्राम ते बिहार हे १ हजार २०० किलोमीटरचे अंतर अवघ्या ६ दिवसांत गाठणा-या ज्योती कुमारीची कहाणी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली होती. आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनीही ज्योतीच्या या जिद्दीची दखल घेतली, इतकच काय तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इव्हान्का ट्रम्प हिनेही ज्योतीच्या जिद्दीची कहाणी वाचत तिचे कौतुक केले होते.

ज्योती कुमारीची कहाणी ऐकल्यानंतर सायकलिंग फेडरेशन आॅफ इंडियाने ज्योतीला चाचणीसाठी बोलावले होते़ ज्योतीने चाचणी यशस्वीपणे पूर्ण केली, तर नेशन सायकल अकॅडमीच्या कॉम्प्लेक्समध्ये ट्रेनी म्हणून तिची निवड होऊ शकते, अशी माहितीही संघटनेच्या अध्यक्षांनी दिली होती. मात्र ज्योतीने हा प्रस्ताव नाकारला आहे.

आपल्याला आपले शिक्षण पूर्ण करायचे आहे. इतक्या लांब प्रवासानंतर आपण थकलो आहे़ याआधी घरच्यांची परिस्थिती आणि घरकाम यामुळे आपल्याला शिक्षण पूर्ण करता आलेले नाही़ पण आता आपल्याला दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करण्याला पहिले प्राधान्य द्यायचे आहे. असा मानस ज्योती कुमारीने बोलून दाखवला.

Read More  सरसेनापती हंबीरराव चित्रपटाचे ४ हजार स्क्वेअर फुटांमध्ये ग्रास पेंटिंग

नेशन सायकलिंग अकॅडमी ही ‘साई’च्या (स्पोर्टस् अथॉरिटी आॅफ इंडिया) अत्याधुनिक सुविधेपैकी एक मानली जाते. आम्ही ज्योतीशी बोललो, लॉकडाउन संपल्यानंतर आम्ही तिला दिल्लीला बोलावले आहे़ तिच्या प्रवासाचा आणि राहण्याचा खर्च संघटनेतर्फे केला जाईल. तिला आपल्यासोबत कोणाला घेऊन यायचे असेल तरीही आम्ही त्याला परवानगी देऊ.

आम्ही बिहारमधील आमच्या अधिकाºयांंशी संपर्कात आहोत, आणि लॉकडाउन संपल्यानंतर तिला दिल्लीला चाचणीसाठी कसे पाठवता येईल याची चर्चा सुरु आहे. सायकलिंग फेडरेशन आॅफ इंडियाचे अध्यक्ष ओंकार सिंह यांनी ज्योतीच्या जिद्दीचे कौतुक केले होते़ ज्योतीचे वडील मोहन पासवान गुरुग्राममध्ये रिक्षा चालवत होते. लॉकडाउन काळात एका छोट्या अपघातात ते जखमी झाल्यामुळे त्यांचा रोजगार तुटला. यानंतर ज्योतीने सायकलवर आपल्या बाबांना पाठीमागे बसवत बिहार गाठण्याचा निर्णय घेतला. १० मे रोजी ज्योती आणि तिच्या वडिलांनी गुरुग्राम सोडले यानंतर १६ मे रोजी ते बिहारमधील आपल्या गावी पोहचले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या