23.8 C
Latur
Monday, August 15, 2022
Homeराष्ट्रीयभारत लोकसंख्येत चीनला मागे टाकणार?

भारत लोकसंख्येत चीनला मागे टाकणार?

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : आज जागतिक लोकसंख्या दिन आहे. सन २०११ साली जगाची लोकसंख्या ७ अब्ज होती. तर २०२१ मध्ये जगाची लोकसंख्या ७.८ अब्ज होती. २०३१ मध्ये जगाची लोकसंख्या ८.६ अब्ज होईल असा अंदाज आहे. गेल्या दशकात जगाची लोकसंख्येत १.१ टक्के दराने वाढत झाली. सध्या जगाची लोकसंख्या दरवर्षी ०.९ टक्के या वेगाने वाढत आहे.

दरम्यान भारत जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या देशांपैकी एक देश होण्याची शक्यता आहे. २०२३ मध्ये भारत चीनला मागे टाकून जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश बनण्याचा अंदाज संयुक्त राष्ट्राच्या अहवालात म्हटले आहे. युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंडच्या डेटावरून असे दिसून येते की आफ्रिकेतील लोकसंख्या सर्वाधिक २.५ टक्के दराने वाढत आहे. दुसरीकडे भारताची लोकसंख्या १४०.६६ कोटींवर पोहोचली आहे. लोकसंख्या दरवर्षी ०.९% या दराने वाढत आहे. भारताने अनेक बाबींमध्ये बरीच प्रगती केली आहे. मात्र काही बाबींवर भारताची कामगिरी खराब आहे. भारतात अद्याप बालविवाह पूर्णपणे बंद झालेले नसून २७ टक्के मुलींची लग्न १८ वर्षांच्या आधी होतात.

२०५० मध्ये अन्नाची गरज भागवणे कठीण
सन २०५० सालातील सर्वात मोठे आव्हान लोकांना अन्न पुरवण्याचे असेल, असे संयुक्त राष्ट्राने म्हटले आहे. तोपर्यंत जगाची लोकसंख्या ९ अब्ज होईल. तेव्हा एवढ्या मोठ्या लोकसंख्येला निरोगी ठेवण्यासाठी पोषक आहार देण्याचे मोठे आव्हान असेल. एवढ्या मोठ्या लोकसंख्येची अन्नाची गरज भाविण्यासाठी विकसित देशांचे कृषी उत्पादन ६० टक्क्यांनी आणि विकसनशील देशांना त्यांचे कृषी उत्पादन दुप्पट करावे लागणार आहे.

जगातील लोकसंख्येची गती मंदावली
जगातील लोकसंख्या ही १९५० नंतर आतापर्यंतची सर्वात धीम्या गतीने वाढत आहे. या अंदाजानुसार, जगातील लोकसंख्या ही वर्ष २०३० पर्यंत ८.५ अब्ज इतकी होईल. वर्ष २०५० पर्यंत जगातील एकूण लोकसंख्या ९.७ अब्ज इतकी होईल, असा अंदाज आहे. २०८० मध्ये जगाची लोकसंख्या १०.४ अब्ज इतकी होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

अनेक देशांचा दन्मदर घटला
अनेक विकसनशील देशाच्या जन्मदरात घट झाली आहे. येत्या काही वर्षात आठ देशांची लोकसंख्या वेगाने वाढणार आहे. यामध्ये कांगो, इजिप्त, इथियोपिया, भारत, नायजेरिया, पाकिस्तान, फिलीपाइन्स आणि टांझानिया या देशांचा समावेश आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या