न्ययॉर्क : गुगल आणि गुगलच्या सर्च इंजिन शिवाय सध्या जगाचं पानही हालत नाही असं म्हटलं जातं. Yahoo आणि Bingने काही काळ Googleशी स्पर्धा केली. मात्र त्यांचा फार काळ टीकाव लागू शकला नाही. त्यामुळे बाजारपेठेवर आता गुगलचं वर्चस्व असून जगातल्या लोकांचा महाप्रचंड असा डेटा गुगलकडे आहे. आता टेक जगतात आघाडीवर असलेली Apple ही कंपनीही आता आपलं सर्च इंजिन तयार करण्याच्या प्रयत्नात असल्याची आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चा आहे.
यावर Appleने अधिकृत काहीही प्रतिक्रिया दिलेली नसली तरी याबाबत कंपनीच्या काही निर्णयावरून हा अंदाज लावला जात आहे. टेक जगतात आघीडीच्या समजल्या जाणाऱ्या Coywolf या वेबसाईटने याबाबतचा एक रिपोर्ट दिला आहे. त्यात हे संकेत देण्यात आले आहेत.
गुगल आणि Appleमधला हा करार आता लवकरच संपणार
गुगल Appleला त्यांच्या iPhone, iPad आणि इतर डिव्हाईसमध्ये डिव्हाईसमध्ये डिफॉल्ट सर्च इंजिन ठेवण्यासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपये देत असते. गुगल आणि Appleमधला हा करार आता लवकरच संपणार आहे. त्यामुळे स्वत:चं सर्च इंजिन तयार करण्यासाठी Appleने कंबर कसल्याचं बोललं जात आहे.
बोरफळ येथे नालीचे घाण पाणी रस्त्यावर