23.8 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeआंतरराष्ट्रीयजॅडा सोडणार विल स्मिथची साथ?

जॅडा सोडणार विल स्मिथची साथ?

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : जागतिक स्तरावर चित्रपटसृष्टीतील सर्वांत मानाचे पुरस्कार म्हणून ‘ऑस्कर पुरस्कार’ ला ओळखले जाते. या मानाच्या पुरस्काराकडे जगातील अवघ्या मनोरंजन विश्वाची नजर लागून असते.
सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार पटकावणा-या अभिनेता विल स्मिथ याने कार्यक्रमात सूत्रसंचालक ख्रिस रॉकच्या कानशिलात लगावली होती. या घटनेनंतर याचे व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले.

यावेळी ख्रिस रॉकने विल स्मिथची पत्नी जॅडा स्मिथ हिच्या आजारपणाची खिल्ली उडवल्याने त्याचा राग अनावर झाला आणि विल स्मिथने थेट स्टेजवर जात रॉकच्या कानशिलात लगावली. जिच्यासाठी विलने ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात राडा केला, तीच आता त्याच्याशी घटस्फोट घेणार असल्याचे वृत्त समोर येत आहे. विल आणि जॅडा यांच्या वैवाहिक आयुष्यात आधीपासूनच कलह होते, मात्र ऑस्करच्या घटनेनंतर हा वाद आणखी वाढला. त्या घटनेनंतर जॅडा आणि विल यांच्यात फारसा संवाद होत नसल्याचे कळते. इतकेच नव्हे तर जॅडाने विलला घटस्फोट देण्याचे ठरवल्याचे समजतेय.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या