23.6 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeराष्ट्रीयआता लखनौचे नाव बदलणार?

आता लखनौचे नाव बदलणार?

एकमत ऑनलाईन

दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि त्यांच्या सरकारच्या मंत्र्यांची भेट घेतली. यादरम्यान, पंतप्रधान मोदींनी योगी सरकारच्या मंत्र्यांना त्यांच्या क्षेत्रात जास्तीत जास्त वेळ देण्याच्या सूचना दिल्या. असे असले तरी सर्वाधिक चर्चा ही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या ट्विटची होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी त्यांनी एक ट्विट केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लखनौला पोहोचल्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांचे स्वागत केले.

तसेच त्यांनी एक फोटोही शेअर केला. यामध्ये त्यांनी शेषावतार भगवान श्री लक्ष्मण यांच्या पावन नगरी लखनौमध्ये तुमचे हार्दिक स्वागत व अभिनंदन..’ असे म्हटले. यात त्यांनी नाव बदलण्याबाबत कुठेही उल्लेख केला नाही. परंतु भगवान श्री लक्ष्मण यांची पावन नगरी असा उल्लेख केल्याने सोशल मीडियावर मात्र याची चर्चा रंगली होती. काही लोकांनी लखनौचे नाव बदलून लक्ष्मणपुरी ठेवण्याचाही सल्ला दिला.

यापूर्वी योगी आदित्यनाथ यांनी काही ठिकाणांची नावं बदलली होती. त्यांनी अलाहाबादचे नाव बदलून प्रयागराज केले होते. त्यानंतर फैजाबादचे नाव बदलून अयोध्या करण्यात आले. याशिवाय मुगलसराय स्टेशनचे नाव बदलून पंडित दीनदयाल रेल्वे स्टेशन करण्यात आले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या