26.7 C
Latur
Friday, December 3, 2021
Homeराष्ट्रीयअशांतता पसरविणा-यांना सोडणार नाही

अशांतता पसरविणा-यांना सोडणार नाही

एकमत ऑनलाईन

श्रीनगर : गेल्या काही दिवसांत काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून टार्गेटेड किलिंगचे प्रकार वाढले आहेत. गेल्या महिनाभरातच जवळपास दहा सामान्य नागरिक अशा हल्ल्यांना बळी पडले आहेत. काश्मीरमध्ये १९९० सारखी परिस्थिती निर्माण होतेय का, अशीही चर्चा त्यामुळे सुरु झाली आहे. याच पार्श्वभूमीवर स्थितीचा थेट आढावा घेण्यासाठी शनिवार दि. २३ ऑक्टोबर रोजी गृहमंत्री अमित शहा काश्मीरमध्ये दाखल झाले असून, देशाचे नंदनवन असलेल्या जम्मू आणि काश्मिरात अशांतता पसरविणा-यांना सोडणार नसल्याचा सूचक इशारा दहशवाद्यांना दिला आहे.

जम्मू काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून दहशवादी कारवायांमध्ये वाढ झाल्यामुळे अशांतता निर्माण झालीये. याच पार्श्वभुमिवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सध्या जम्मू काश्मीर दौ-यावर आहेत. गृहमंत्री अमित शहा यांनी यावेळी नागरीकांच्या हत्या आणि दहशतवाद्यांच्या वाढत्या कारवायांबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी सुरक्षा दलांना एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन अमित शहा यांनी उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठकीत केल्याचे सूत्रांनी सांगितले. गृहमंत्र्यांनी सर्व सुरक्षा यंत्रणांना शक्य तेवढ्या लवकर दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी एकत्रितपणे काम करण्यास सांगितले. तसेच कट्टरपंथीयांवर नियंत्रण ठेवण्याचेही काम करण्याचे पोलिसांना आवाहन केले.

शहिदांच्या कुटुंबांना दिली भेट
मागील काही दिवसात कट्टरतावाद्यांकडून जम्मू काश्मीरमध्ये सामान्य नागरिकांसह सुरक्षा दलावरही हल्ले झाले. यात अनेक जणांना आपला जीव गमवावा लागला. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ३ दिवसीय जम्मू काश्मीर दौ-यावर आलेत. यावेळी त्यांनी सर्वात आधी कट्टरतावाद्यांच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या पोलिस अधिका-यांच्या कुटुंबाला भेट दिली. तसेच मृत अधिकारी परवेज अहमद यांच्या पत्नीला सरकारी नोकरीची कागदपत्रे सूपूर्त केली. शाह यांच्या या दौ-याच्या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली.
कलम ३७० हटवल्यानंतर पहिलाच दौरा
जम्मू काश्मीरचा पूर्ण राज्याचा दर्जा रद्द करत कलम ३७० हटवल्यानंतर अमित शाह यांचा हा पहिला काश्मीर दौरा आहे. त्यामुळे २ वर्षांनंतर होणारा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. शाह यांचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी विमानतळावर स्वागत केले. पोलिस अधिका-याच्या कुटुंबाला भेट देताना देखील ते शाह यांच्या सोबतच होते. याशिवाय केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह आणि पोलिस महासंचालक दिलबाग सिंह हे देखील या भेटीच्या वेळी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या