23.8 C
Latur
Monday, August 15, 2022
Homeमहाराष्ट्रफडणवीस यांच्या नव्या मंत्रिमंडळात पंकजा मुंडेंना जागा मिळणार का?

फडणवीस यांच्या नव्या मंत्रिमंडळात पंकजा मुंडेंना जागा मिळणार का?

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्यात आठवडाभर सुरू असलेल्या सत्तासंघर्षामध्ये अखेर उद्धव ठाकरे सरकार पायउतार झाले आहे. उद्धव ठाकरे यांनी बुधवारी रात्री राजीनामा दिला.

त्यांच्या राजीनाम्यानंतर राज्यात भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे गट यांच्या युतीचे सरकार येणार हे आता स्पष्ट झाले आहे. नव्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होणार हे देखील स्पष्ट आहे. त्याचबरोबर नव्या सरकारमध्ये कोण मंत्री असणार याची चर्चा आता सुरू झाली आहे. कुणाला मिळणार संधी? फडणवीस सरकारमध्ये एकनाथ शिंदे गटाला १२ मंत्रिपदं मिळणार असे मानले जात आहे.

मावळत्या ठाकरे सरकारमध्ये या गटाचे ५ मंत्री होते. शिंदे यांना ५० आमदारांचा पाठिंबा आहे. त्यामुळे त्यांना नव्या मंत्रिमंडळात देखील पुरेशी संधी मिळणार हे नक्की आहे. शिंदे गटामधील विदर्भातील आमदार संजय राठोड यांना पुन्हा मंत्रिपद मिळणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

राठोड हे ओबीसी समाजातील नेते असून ते ठाकरे सरकारमध्ये वनमंत्री होते. त्यांना पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात राजीनामा द्यावा लागला होता. नव्या मंत्रिमंडळात राठोड यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळणार असे मानले जात आहे.

पंकजांचे भवितव्य काय?
ओबीसी नेते संजय राठोड हे मंत्री झाले तर भाजपामधील प्रभावशाली ओबीसी नेत्या पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार का? याकडे त्यांच्या समर्थकांचे लक्ष लागले आहे. पंकजा या मराठवाड्यातील भाजपाच्या प्रभावशाली नेत्या आहेत. माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांचा त्यांना वारसा आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या