नवी दिल्ली : एकेकाळी वाहन बाजारात राज्य करणारी ऍम्बेसेडर कार नव्या अवतारात पुन्हा बाजारात येण्याची शक्यता आहे. यासाठी हिंदुस्तान मोटर्स कंपनी जोमाने तयारीला लागली आहे. हिंदूस्तान मोटर्स कंपनी ऍम्बेसेडरला इलेक्ट्रिक रुपात बाजारात आणण्याचा विचार करत आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार हिंदुस्तान मोटर्स इलेक्ट्रिक स्कूटर्सचे उत्पादन करण्यासाठी युरोपियन इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपनीसोबत भागीदारी करण्याची योजना आखत आहे.
चेन्नईत बनणार नवे मॉडेल
भागीदारीची संपूर्ण प्रक्रिया सुमारे तीन महिन्यांत पूर्ण होईल. कंपनी सुरुवातीला इलेक्ट्रिक टू-व्हीलरचे उत्पादन करणार असल्याचे अहवालात म्हटले आहे. तसेच आगामी प्रकल्पातील सहयोग ५१/४९ गुणोत्तरावर आधारित असेल. ऍम्बेसेडरचे नवीन मॉडेल हिंदुस्थान मोटर्सच्या चेन्नई उत्पादन प्लांटमध्ये तयार केले जाईल. जे सध्या एचएमएफसीआयच्या मालकीचे आहे. आता ही कंपनी सी.के.बिर्ला समूहाचा भाग आहे.भागीदारीची संपूर्ण प्रक्रिया सुमारे तीन महिन्यांत पूर्ण होईल. कंपनी सुरुवातीला इलेक्ट्रिक टू-व्हीलरचे उत्पादन करणार असल्याचे अहवालात म्हटले आहे. हिंदुस्तान मोटर्सच्या उत्तरपारा प्लांटमधील शेवटची ऍम्बेसेडर सप्टेंबर २०१४ मध्ये बनवली होती. त्यावेळी निर्मात्यावर खूप कर्ज होते आणि विक्री कमी होती, म्हणून ब्रँड ग्रुप पीएसएला विकला गेला.
स्वस्त कारमुळे ऍम्बेसेडरसमोर आव्हान
१९७० च्या दशकात हिंदुस्थान मोटर्सचा भारतीय ऑटोमोबाईल बाजारात ७५% हिस्सा होता. ते आयकॉनिक ऍम्बेसेडर कारचे उत्पादन करत होते. जेव्हा मारुती ८०० आणि इतर मॉडेल्ससारख्या स्वस्त आणि अधिक परवडणा-या कार देशात येऊ लागल्या, तेव्हा हिंदुस्थान मोटर्स ऍम्बेसेडरसमोर आव्हान उभे राहिले. २०१७ मध्ये, ग्रुप पीएसणने हिंदुस्तान मोटर्सच्या मालकीच्या बिर्ला ग्रुपकडून प्युजॉट आणि ऍम्बेसेडर ब्रँड खरेदी केला.