24 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeमहाराष्ट्रमुख्यमंत्र्यांच्या सभेला पैसे देऊन जमवणार गर्दी? ऑडिओ क्लिप व्हायरल

मुख्यमंत्र्यांच्या सभेला पैसे देऊन जमवणार गर्दी? ऑडिओ क्लिप व्हायरल

एकमत ऑनलाईन

पैठण : मंत्री संदीपान भुमरे यांचा मतदारसंघ असलेल्या पैठणमध्ये आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेत संदिपान भुमरे शक्तिप्रदर्शन करणार असून आज होणा-या मुख्यमंत्र्यांच्या सभेला पैसे देऊन गर्दी जमवण्यात येत असल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला आहे. दरम्यान यासंदर्भात एक ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होत आहे.

आज मुख्यमंत्र्यांच्या होणा-या सभेसाठी महिलांना प्रत्येकी ३०० रूपये देण्याची मागणी करताना या क्लिपमध्ये ऐकायला येत आहे. तर समोरचा व्यक्ती एका महिलेला २५० रूपये देण्यासंदर्भात बोलत असल्याचं समजत आहे. त्याचबरोबर शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनीही पैसे देऊन गर्दी केली जाणार असल्याचा आरोप केला आहे.

तात्पुरत्या मुख्यमंत्र्यांसाठी भुमरे खोके खाली करत आहेत असे वक्तव्य करत माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी भुमरेंवर निशाणा साधला आहे. तात्पुरते मुख्यमंत्री पैठणला येत आहेत आणि त्यांच्या सभेसाठी कुठून कुठून माणसे आणले जात आहेत.

तालुक्याच्या बाहेरून प्रत्येकाला पैसे देऊन लोकं आणले जात आहेत. मला अनेक लोकांचे फोन आले आणि सांगितलं की प्रत्येकाला २५०-३०० रूपये दिले जात आहेत आणि गाडीत बसवले जात आहे. असा आरोप चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या