26.6 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeमहाराष्ट्रसत्ता संघर्षावरील सुनावणी लांबणार?

सत्ता संघर्षावरील सुनावणी लांबणार?

एकमत ऑनलाईन

१ ऐवजी २ ऑगस्टला सुनावणीची शक्यता
नवी दिल्ली : महाराष्ट्रात नव्याने स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारचा येत्या १ ऑगस्टला सुप्रीम कोर्टात फैसला होणार असल्याचे अगोदरच जाहीर झाले होते. शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेच्या मागणीसह शिवसेनेने दाखल केलेल्या सर्वच याचिकांवर १ ऑगस्टला सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार होती. मात्र, ही सुनावणी लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. अर्थात, ही सुनावणी १ ऑगस्टऐवजी २ ऑगस्टला होण्याची शक्यता आहे.

सुप्रीम कोर्टाच्या पुढील आठवड्यातील सुनावणींविषयी यादी येत असते. त्या यादीनुसार २ ऑगस्टला राज्य सरकारशी संबंधित याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे घटनात्मक खंडपीठापुढे ही सुनावणी होणार, अशी चर्चा होती. पण अजूनही घटनात्मक खंडपीठ स्थापन करण्यात आलेले नाही. केस लिस्टेड आहे. पण सुनावणी १ ऑगस्टऐवजी २ ऑगस्टला होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील सत्तासंघर्षाच्या सुनावणीसाठी आणखी प्रतीक्षा वाढण्याची शक्यता आहे. या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहे. यामुळे मंत्रिमंडळ विस्तारदेखील रखडलेला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या