24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeराष्ट्रीययावर्षी खरीप हंगामात मका आणि उसाचे विक्रमी उत्पादन होणार?

यावर्षी खरीप हंगामात मका आणि उसाचे विक्रमी उत्पादन होणार?

एकमत ऑनलाईन

मुंबई : प्रमुख खरीप पिकांच्या उत्पादनाचा प्राथमिक अंदाज जाहीर झाला आहे. २०२२-२३ च्या खरीप हंगामात १४९.९२ दशलक्ष टन अन्नधान्य उत्पादनाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हा अंदाज कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने जाहीर केला आहे. यामध्ये मका आणि उसाच्या विक्रमी उत्पादनाचा अंदाज मंत्रालयाने वर्तवला आहे.

शेतक-यांची मेहनत, शास्त्रज्ञांची प्रगल्भता आणि शेतकरी हिताची सरकारची धोरणं यामुळे कृषी क्षेत्राचा दिवसेंदिवस विकास होत असल्याचे मत केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी व्यक्त केले.

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीने २०२२-२३च्या खरीप हंगामातील पहिला प्राथमिक अंदाज जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये मका आणि उसाचे विक्रमी उत्पादन होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सरकारच्या धोरणामुळे दिवसेंदिवस कृषी क्षेत्राचा विकास होत असल्याचे मत यावेळी कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी व्यक्त केले आहे.

मक्याचे विक्रमी उत्पादन होणार
२०२२-२३ च्या पहिल्या हंगामी अंदाजानुसार (फक्त खरीप), देशात एकूण अन्नधान्य उत्पादन १४९.९२ दशलक्ष टन असल्याचा अंदाज आहे. तो मागील पाच वर्षांच्या सरासरी अन्नधान्य उत्पादनापेक्षा ६.९८ दशलक्ष टन अधिक आहे. २०२२-२३मध्ये खरीप तांदळाचे एकूण उत्पादन १०४.९९ दशलक्ष टन अंदाजित आहे. मागील पाच वर्षांचे सरासरी उत्पादन १००.५९ दशलक्ष टन होते. त्यापेक्षा ते ४.४० दशलक्ष टनांनी जास्त आहे.

२०२२-२३ मध्ये देशात मक्याचे उत्पादन विक्रमी २३.१० दशलक्ष टन असल्याचा अंदाज आहे. सरासरी १९.८९ दशलक्ष टन उत्पादनापेक्षा तो ३.२१ दशलक्ष टन अधिक आहे. तर खरीप पोषक/ भरड तृणधान्यांचे उत्पादन अंदाजे ३६.५६ दशलक्ष टन आहे जे सरासरी ३३.६४ दशलक्ष टन उत्पादनापेक्षा २.९२ दशलक्ष टन अधिक आहे.

तेलबियांच्या उत्पादनातही वाढ होणार
२०२२-२३ मध्ये देशातील एकूण खरीप तेलबियांचे उत्पादन २३.५७ दशलक्ष टन असल्याचा अंदाज आहे. जे सरासरीपेक्षा १.७४ दशलक्ष टन अधिक आहे. २०२२-२३ मध्ये देशातील उसाचे एकूण उत्पादन ४६५.०५ दशलक्ष टन इतके विक्रमी असल्याचा अंदाज आहे. २०२२-२३ मधील उसाचे ३७३.४६ दशलक्ष टन इतके असून ऊस उत्पादन सरासरीपेक्षा ९१.५९ दशलक्ष टनांनी जास्त आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या