37.3 C
Latur
Saturday, May 28, 2022
Homeआंतरराष्ट्रीयट्रम्प यांची ट्विटरवर होणार घरवापसी?

ट्रम्प यांची ट्विटरवर होणार घरवापसी?

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : जानेवारी २०२१ मध्ये अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या निकालानंतर झालेल्या हिंसाचाराला जबाबदार धरत ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने त्यांच्यावर बंदी घातली होती. ६ जानेवारी रोजी यूएस कॅपिटलमध्ये उसळलेल्या दंगलीसाठी त्यांना जबाबदार धरण्यात आले होते. हिंसाचार आणखी वाढण्याचा धोका लक्षात घेऊन ट्विटरने ८८ दशलक्ष फॉलोअर्स असलेल्या ट्रम्प यांच्या ट्विटर खात्यावर तात्काळ प्रभावाने कायमची बंदी घातली होती. मात्र ट्विटरचा मालकी हक्क आता टेस्ला कंपनीचे मालक इलॉन मस्क यांच्याकडे जाणार आहे.

या वर्षात ट्विटर खरेदीचा व्यवहार पूर्ण होणार आहे. इलॉन मस्क यांनी ट्विटर ४४ अब्ज अमेरिकन डॉलर्सना विकत घेतले आहे. तेव्हापासून ट्रम्प यांच्यावरील बंदी उठवण्याची शक्यता वर्तवली जात होती. ज्यावर आता इलॉन मस्क यांनी शिक्कामोर्तब केले आहे.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ट्विटरवर पुन्हा एकदा येणार असल्याचे संकेत मिळाल्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा वर्षाव सुरू झाला आहे. अनेक मजेशीर मीम्स नेटकरी शेअर करत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या