25.6 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeमहाराष्ट्रबाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाला उद्या भेट देणार; एकनाथ शिंदे यांची घोषणा

बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाला उद्या भेट देणार; एकनाथ शिंदे यांची घोषणा

एकमत ऑनलाईन

मुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासहित पक्षातील बंडखोर तसेच अपक्ष आमदारांनी गुवाहाटीमधील कामाख्या देवीचे दर्शन घेतले. एकनाथ शिंदे उद्या आमदारांसहित मुंबईसाठी रवाना होणार असून त्याआधी त्यांनी देवीचे दर्शन घेतले.

यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी आपल्याकडे बहुमत असल्याचा दावा केला. तसेच मुंबईत आल्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर जाणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, ‘‘उद्या आम्ही सर्व आमदार मुंबईत पोहोचणार आहोत. आमच्याकडे ५० लोक असून बहुमत आहे. आमच्या गटाकडे बहुमत आहे त्यामुळे आम्हाला बहुमत चाचणीची चिंता नाही. जी प्रक्रिया असेल त्यात आम्ही जिंकू. आम्हाला कोणीही रोखू शकत नाही. लोकशाहीत क्रमांक आणि बहुमताला महत्त्व असते. या देशात संविधान, कायदा आणि नियमाच्या पुढे कोणी जाऊ शकत नाही.’’

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या